Today : 05:07:2020


वाघाचे पगमार्क आढळले मात्र नरभक्षक वाघ दिसेना पगमार्क दिसल्याची वनविभागाचे म्हणणे

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही वनविकास महामंडळाच्या कम्पारमेंट मध्ये रविवार सकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महीलेचा छिन्न विछिन्न मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे वाघाच्या दहशतीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. रविवारला नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात २०  कॅमेरे लावण्यात हि आले होते. मात्र कॅमेऱ्यात वाघाचे छायाचित्र न आल्याची माहीती वनविकास महामंडळचे वनपरिक्षेत्राधिकारी जग्गीडवार यांनी दिली होती. मंगळवारला मात्र वाघाचे पगमार्क आढळल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी गोंड यांनी दिली.
     वनविकास महामंडळच्या जंगल परिसरात रविवारला कमल निकोडे नामक महिलेला वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे सिंदेवाही परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. नरभक्षक वाघाचा शोध घेवून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत जोर धरू लागल्याने वनविभाग जागे होत नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी घटना परिसरातील जंगलात वाघाचे छायाचित्र टिपण्यास कॅमेरे लावून गाव परिसरात दवंडी पिटून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला.
तसेच त्याजंगल परिसरात लाल झेंड्या लावून धोक्यापासून सावधान रहावे व जंगल परिसरातील शेतशिवारात कामावर जाणाऱ्यांनी दुपारच्या तीन वाजेपासूनच परिसर सोडावा असा इशारा वनविकास महामंडळाने दिला आहे.
     नरभक्षक वाघाची शोधमोहीम राबविण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्र विभागाने ११ तर वनविकास महामंडळाने ९ असे एकूण २० कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र आजतागायत त्या एकाही कॅमेऱ्यात वाघाचे छायाचित्र आलेले नाही. मात्र वाघाचे पगमार्क आढळल्याची माहिती विदर्भ टाईम न्युजला मिळाली आहे. पुन्हा शोधमोहीम राबविण्यासाठी एस.डब्लू.सी.टी. एन.जी.ओ. च्या वतीने कॅमेरे लावून नरभक्षक वाघाचा शोध घेतला जात आहे.
     त्या नरभक्षक वाघाची दहशत कायम असून त्या वाघाचा शोध सबंधित प्रशासन घेत असला तरी नरभक्षक वाघ दिसून येत नसल्याने तो नरभक्षक वाघ गेला कुठे ? असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे. वाघाचे छायाचित्र येण्यासाठी संबंधित परिसरात कॅमेरा लावूनही वाघ दिसेना.मात्र वाघाचे पगमार्क आढळून आल्याचे वनपरिक्षत्राधिकारी यांनी सांगितले असल्याने ते पगमार्क त्या नरभक्षक वाघाचे की ईतर दुसऱ्या वाघाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोला