Today : 23:02:2020


नवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा (ऐका डॉक्टरवर दवाखाना निर्भर)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :-  नवरगाव हे पंधरा हजार लोक संख्येचे गाव असून या परिसरातील गावांच्या नागरिकांचे आरोग्याचा कारभार प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत चालतो. या आरोग्य केंद्राला तीन चिकित्सकाची आवश्यकता असतांना एका चिकित्सकावर कित्येक वर्षापासून कारभार चालविला जात आहे. या आरोग्य केंद्रातील विविध पदे रिक्त असल्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध सोयी सविधा मिळत नसल्याने ग्रामिण भागातील जनतेची हयगय होत आहे. त्यामुळे जनतेत सबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींवर यांचे खापर फोडले जात आहे.
     आजच्या घडीला ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा तत्पर पुरविणे गरजेचे झाले आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही. नवरगाव आरोग्य केंद्रात तिन डॉक्टरची आवश्यकता आहे मात्र कित्येक वर्षापासून दोन डाक्टरचे पद रिक्त आहे. तसेच फार्माशिस्ट-1, टेक्निशियन-1, परिचर-2, क्लर्क-1, प्रसूती पेशालिस्ट चे पद ही रिक्त आहे. 
     मागील एक महीना पूर्वीपासून गर्भवती मातांची युरेन टेस्ट व एच बी टेस्ट ची सुविधा सध्यस्थितीत उपलब्ध नसल्याने खाजगी पॅथालॉजीचा आधार घ्यावा लागत आहे. शासन स्तरावरून पॅथालॉजी टेक्नीशियन (कंत्राटी) यांना पदावरून रिक्त केल्याने त्या ठिकाणी तपासणी सुविधेचा अभाव निर्माण झाल्याने रूग्णांची हयगय होत आहे. शासन स्तरावरून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सुरळीत आरोग्य सेवा पुरवू शकत नसेल तर त्या आरोग्य  केंद्राचा काय उपयोग ? असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे.
     वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी जनतेच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोपाचे स्थानिक खापर फोडले जात आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांची कोणत्याही प्रकारे हयगय होणार नाही. याकरिता रिक्त पदाचा भरणा करून आरोग्याच्या सोयी-सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur