Today : 19:02:2020


नागपुर विधीमंडळावर धडकणार जुनी पेंशन हक्क संघटनेचा जनआक्रोश मुंडन मोर्चा

"१८ डिसेंबरला नागपुर विधीमंडळावर शासकीय व निमशासकीय कर्मचारी करणार तिव्र आंदोलन"
विदर्भ टाईम्स न्यूज / महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊन (महाराष्ट्राच्या कोणत्याही सभागृहात/सदनात चर्चा न करता) १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत सुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना बंद करून नवीन पारिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन (डि.सी.पी.एस/ एम.पी.एस.) लागू करून सर्व शासकीय/ निमशासकीय कर्मचारी व त्यांच्या प्रिय परिवारावर अन्याय केला आहे. 
     याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी नागपुर विधीमंडळावर कर्मचाऱ्यांचा तिव्र जनआक्रोश मुंडन मोर्चा धडकणार असल्याबाबत दक्षिण गडचिरोलीचे सचिव श्री रमेश रामटेके यांनी विदर्भ टाईम्स न्यूज सोबात बोलतांना माहिती दिली. शासनांने शासकीय कर्मचाऱ्याचे कुठलेही हित लक्षात न घेता सदर योजना लादली असून सेवा निवृत्ती नंतर मिळणारे निवृत्ती वेतन या बाबत कुठलेही निश्चिता नाही, यामुळे कर्मचाऱयात मोठा संताप निर्माण झाला आहे. 
     या करिता शासनाला जेरीस आणून कर्मचाऱ्यांचे हिताची (१९८२ व १९८४) जुनी पेंशन योजना लागू करावी या करीता हिवाळी अधिवेशनावर होणाऱ्या जनआक्रोश मुंडन मोर्चाच्या नियोजना बाबत दिनांक १० डिसेम्बर २०१७ रोजी झालेल्या अहेरी, सिरोंचा, एत्तपल्ली, भामरागड तालुक्याच्या संयुक्त सभेत बोलतांना सर्व पेंशन धारक व डि.सी.पी.एस/ एम.पी.एस. धारक कर्मचारी सभागी व्हावे असे आव्हान श्री रमेश रामटेके यांनी आव्हान केले आहे. सदर सभेचे अध्यक्ष उमाजी गोवर्धन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री वाडई, उमरे, राजू सोनटक्के, मनीष कावडे, योगेश शेरेकर, सतीश खाटेकर तसेच चारही तालुक्यातील अध्यक्ष/सचिव तसेच सर्व तालुका पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या जनआक्रोश मुंडन मोर्चात दक्षिण गडचिरोलीतील ४७३० कर्मचारी सहभागी होणार असल्याची नोंद झाली असून येत्या १८ तारखेपर्यंत संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
               "निवृत्तीनंतर कायम स्वरूपी उत्पन्नाचे साधन व केलेल्या सेवेचे बक्षिस तसेच सामाजिक सुरक्षिता या बाबी विचारात घेऊन निवृत्ती वेतन दिले जाते हि वस्तू स्थिती आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने डि.सी.पी.एस/ एम.पी.एस. योजना सुरु करून १ नोव्हेम्बर २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय करून अन्याय कारक निर्णय कर्मचाऱ्यावर लादला असून सरकारने आपल्या सामाजिक कर्तव्य व सामाजिक सुरक्षेपासून हात झटकले आहे"                                                                                                                                     रमेश रामटेके, सचिव, जुनी पेंशन हक्क संघटना दक्षिण गडचिरोली 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur