Today : 12:11:2019


कनिष्ठ महाविद्यालयांना कुलूप, प्राध्यापक बसले नागपुरात (शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचा पाठिंबा/अनुदानाची मागणी)

सैय्यद मुमताज अली, गडचांदूर :-  महाराष्ट्रातील विना अनुदानित असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मागील १६ वर्षांपासून एकही रुपया न घेता विद्यादानाचे काम करीत आहे. अश्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांंवर अक्षरशः उपसमारीची वेळ आली आहे. शासनाने तातडीने शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याच्या मागणी साठी कृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर, पासून बेमुदत बंदचे आवाहन केले आहे.
     विना अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मूल्यांकीत करून अनुदान करिता ताटकळत ठेवले आहे. अशा महाविद्यालयची राज्यात ३२०० पेक्षा अधिक संख्या आहे. तरी त्या महाविद्यालयात एकूण २२४०० शिक्षक कार्यरत असून त्यांना मागील १६ वर्षे पासून वेतन नाही. २६ फरवरी २०१४ रोजी शासनाने कायम शब्द काडुन अनुदानासाठीची मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली या गोष्टीला ४ वर्षे उलटून गेली तरीही अनुदान पात्र शाळांची यादी घोषित केलेली नाही. या बाबत समितीने मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद विभागात आजपावेतो २०६ आंदोलने लोकशाही मार्गाने केली. 
     माञ शासनाच्या उदासीनते मुळे केवळ आश्वासने मिळाली. शासनाचे शिक्षण विषयक धोरण आजपर्यंत कमकुवत राहिले असून याचा फटका राज्यातील हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांना बसत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा.तानाजी नाईक यांच्या नेतृत्वात बेमुदत बंद पुकारण्यात आले. ११ डिसेंबर पासून नागपूर विधान भवनावर मोर्च्या द्वारे सर्व शिक्षक बंद मध्ये सहभागी झाले असून महाविद्यालये बंद, प्राध्यापक नागपुरला अशी परिस्थिती आहे.

"याविषयी त्वरित तोडगा न निघाल्यास येणाऱ्या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार."
          शासनाच्या बेजबाबदार धोरणाच्या विरुद्ध पुकारण्यात आलेल्या आंदोलनातून तात्काळ तोडगा न निघाल्यास येणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या कामकाजावर असहकार व बहिष्कार घालण्यात येईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे नागपूर विभागीय सचिव प्रा.उमेश ढवळे जिल्हाध्यक्ष प्रा.अलगमकर संघटक प्रा.प्रकाश लालसरे, प्रा.दांडेकर, प्रा.साई कुंभारे, प्रा.मालेकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी व संपूर्ण विना अनुदानित कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यत