Today : 08:08:2020


चिमुर तालुक्यात अवैधपणे गौण उत्खनन जोरात - अवैधरीत्या उत्खननाची माहिती देणार्‍यास महसुल विभागाचे सहकार्य नाही.

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमुर शहरात इमारत बांधकामांना वेग आला असून बांधकामासाठी रेतीची मोठी मागणी असते. त्यामुळे रेती कंत्राटदारांना सुगीचे दिवस आले आहेत. चिमुर-तालुक्यातील काही महाभाग महसुल विभागाच्या आशिर्वादाने अवैधपणे नेहमी रेती व मुरमांची तस्करी करीत असून, या महाभागाकडे तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चिञ आहे. काही अधिकारी तर आर्थिक प्रेमापोटी अर्थपूर्ण सेटिंग करून दुर्लक्ष करीत आहेत.
     अवैधरीत्या वाळू व मुरमाची चिमुर तालुक्यात नेहमी तस्करी सुरु असते. याचबरोबर लिजच्या नावावर सुध्दा जोरदार मुरुम व रेतीची तस्करी सुरू आहे. १०० ब्रास मुरमांची लिज असल्यास ५०० ब्रासच्यावर मुरुमाचे उत्खनन केल्या केल्या जात आहे. अशा वैध मुरुम उत्खनन परवाण्याद्वारे अवैधपणे मुरुम उत्खनन करणाऱ्यां तस्कराकडे महसुल विभाग लक्षच देत नसल्याचे सामोरे आले आहे. 
     बरेच वाळू तस्कर बोगस टिप्याद्वारे लिलाव नसलेल्या रेती घाटावरुन वाळू नेत असून, अशा वाळू तस्कराकडे सुद्धा महसुल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. वाळू व मुरुम तस्करांची एवढी मुजोरी वाढली आहे कि, त्यांचे अवैध मुरुम व वाळू तस्करीचे धंदे उजेडात आणले तर, आणनेवाल्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धंमकी उलट तेच देतात.
     चिमुरला तहसील कार्यालयाबरोबर, उपविभागीय अधिकाऱ्यांचे महसुल कार्यालय आहे. परत भिसी अप्पर तहसीलदार कार्यालयाची भर पडली आहे. असे असतांना अवैध वाळू व मुरुम उत्खननाकडे महसुल विभागाच्या सबंधीतांचे लक्ष का जात नाही? हे एक महा गुलदस्त्यातली बाबच काही तलाठी तर तहसीलदारापेक्षाही मोठे अधिकारी बनले असून, तहसील कार्यालयात बसूनच कार्यालयीन कामे पार पाडतांना दिसतात यांना आपल्या साझावर जाण्याची अजीबात गरज भासत नाही. असे तलाठी शेतकऱ्यांना व आम नागरिकांना त्यांच्या कामा सबंधाने नाहक ञास देत असतांना, अशा तलाठ्याकडे सुद्धा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
     तसेच ज्या तलाठयांनी आपल्या साझ्याकडे पाठ फिरविली आहे, बहूतेक अशा तलाठी साझ्यातंर्गत अवैधरीत्या रेती व मुरुमाची तस्करी बिनधास्त केल्या जात आहे. कार्यालयीन दिवसा बरोबर, कार्यालयीन सुटीच्या दिवशी सुद्धा अवैध उत्खनन होत असते, प्रसंगाला अनुसरुन अवैध उत्खननाची माहिती द्यायची असल्यास तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार व  अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, काॅल केल्यावर दाद देत नसल्याने, त्यांचे संपर्क क्रमांक नसल्यातच जमा असतात. यामुळे महसुल विभागाचे अवैध उत्खनना बाबत काय धोरण आहे हेच कळत नाही. 
     वाळूच्या अवैध उत्खनना बाबत रितशीर शिडी पुराव्यासह तक्रार, चिमुर तहसीलदार व चिमुर येथील अधिकारी यांना दिल्यानंतर सुध्दा, त्यांच्याकडून सदर अवैध उत्खनन प्रकरणाची तात्काळ चौकशी केल्या जात नाही. यामुळे चिमुरचे दोन्ही महसुल कार्यालय, अवैध उत्खननाबाबत किती संवेदनशील आहेत हे लक्षात येते. माञ तक्रारकर्त्याला अवैध उत्खननाच्या चौकशी व कारवाई अहवालासाठी मागील ३ महिण्यापासून उपविभागीय कार्यालय चिमुरसी कायदेशीर संघर्ष करावा लागत असल्याचे उजेळात आले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
निकृष्ट बांधकाम पुन्हा उत्कृष्ट करणेसाठी झोपा क़ाढा (ठिय्या) आंदोलन

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मूल
, दीपक देशपांडे :-  नगर परिषद मूल क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये सोमनाथ मार्गावर केलेले ना