Today : 14:08:2020


स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांची ६१ वी जयंती साजरी

गडचिरोली :- भगवंतराव मेमोरीयल शिक्षण संस्था, अहेरीचे माजी अध्यक्षा स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांची १४ डिसेंम्बर रोजी ६१ जयंती असल्याने आज भगवंतराव आश्रम तथा हॉयस्कुल येथे त्यांना विनम्र अभिवादन देण्यात आले. 
     गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विविध तालुक्यात गोर-गरीब आदिवासी विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी अनुदानित आश्रम शाळा, हॉयस्कुल, महाविद्यालय तथा गोंडवाना सैनिक विद्यालयाची निर्मिती केली आज त्यांना या प्रत्येक शाळेतून, महाविद्यालयातून विनम्र अभिवादन देऊन जयंती साजरी करण्यात येत आहे.
     गडचिरोली जिल्ह्यात आज त्यांच्या या महान कार्यामुळे भगवंतराव मेमोरीयल शिक्षण संस्था द्वारा संचालित १४ हॉयस्कुल तथा १० अनुदानित आश्रम शाळा असे एकूण २४ प्राथमिक, माध्यमिक तथा उच्छ माध्यमिक शाळा असून या शाळेत शिक्षण घेणारे आदिवासी विध्यार्थी खुप मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि अजूनही हजारो विध्यार्थी आपल्या उज्वल भविष्याची वाटचाल करत आहेत. अश्या महान शैक्षणिक कार्य करणारे स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांचा २८ मार्च २०१५ रोजी अत्यंत दुःखद निधन झाले आणि त्या आपल्या सर्वांना सोडून गेल्या मात्र, १९९२ पासून या शैक्षणिक व सामाजिक कार्याची आठवण कोणीही विसरू शकत नाही, त्यांच्या या भगवंतराव मेमोरीयल शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रत्येक शाळेत अथवा त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना आज त्यांची कमतरता भासत असून त्यांच्या आजच्या ६१ व्या जयंती निमित्य गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रम, आरोग्य तपासणी, फळ वाटप करून त्यांना अभिवादन देण्यात येत आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून भद्रावती मध्ये गजानन महाराज यां..