Today : 08:08:2020


सिंदेवाही सह संपुर्ण तालुकाही विकासापासून कोसोदूर (विकासाचा खेळखंडोबा, नागरी सुविधेचा अभाव,बेरोजगारीच्या संख्येत वाढ)

अमर बुद्धापवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्याचे मुख्य ठिकाण असून विकासाच्या बाबतीत दुर्लक्षितपणा झाल्याने दिवसेंदिवस समस्या वाढत असून याकडे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने सिंदेवाहीसह तालुकाही विकासापासून कोसोदूर जात असल्याची ओरड केली जात आहे.
     सिंदेवाही हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे परिसरातील गावखेडयाचा कारभार या ठिकाणावरून चालत असतो. तालुक्याच्या बरेचशा कार्यालयातील कारभारात कर्मचारी व अधिकाऱ्यांचा रिक्त पदाच्या अभावासह काही कार्यालयाचा कारभार प्रभारावर सुरु आहे. त्यामुळे नागरिकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे. तालुक्याचा विकासाचा केंद्रबिंदू व जिल्हाचा भूषण ठरणारा हुमन नदी प्रकल्प ३४ वर्षापासून रखडलेला आहे. घोडाझरी रेस्ट हाऊस बंद अवस्थेत, बस स्थानक आहे मात्र डेपो नाही. तालुक्याच्या विकासाच्या मुद्याकडे दुर्लक्षीतपणा झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय नागभीड ला, एस.डी.ओ. ऑफिस चिमुरला,  पंजाबराव कृषी विद्यापीठ विभाजन झाले नाही. 
     तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन सुविधेचा अभाव गोसीखुर्दचे नहर बांधकाम झाले मात्र पाणी पुरवठा होणार का ? असा प्रश्न विचारला जातोय. सिंचनाच्या अभावामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुका स्टेडियम अर्धवट बांधकाम असलेले सिंदेवाही गावाबाहेर, मुलांचे वस्तीगृह गावचे बाहेर, सिंदेवाही मधील राईस मिलवर व्यवसायाची अवकडा आल्याने बंद अवस्थेत, एम.आय.डी.सी. करिता भूखंड उपलब्ध असला तरी उद्योगाअभावी बेरोजगाराची समस्या कायम आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अवैध दारूविक्रीच्या वाम मार्गाला  लागत असल्याचे बोलले जाते. 
     सरकारी आरोग्य रुग्णालय असून कर्मचाऱ्यांचा अभावासह जुन्याच समस्याग्रस्त इमारतीत कारभार चालतो आहे. सिंदेवाही विद्यार्थ्याची संख्या मोठया प्रमाणात आहे मात्र शिक्षणात बी.ए. व बि.एस.सी. नंतर एम.ए. साठी एम.एस.सी. शिक्षणसुविधा नसल्याने विद्यार्थाना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. आय.टी.आय. शिवाय ईतर शासकीय टेक्निकल कोर्स सुविधा नाही, बि.एड, बि.पी.एड. नाही, सुंदर देवालय नाही, बाग बगीचा नाही, लहान मुलांना खेळण्याचे मैदान नाही,  पंचायत समिती कवेलु असलेले, तहसील ऑफिस टिनाचे, रेल्वे स्टेशन इंग्रज कालीन,  अशा नानाविध भरपूर समस्याने सिंदेवाही तालुक्याचे ठिकाण असलेले शहर विकासा पासून कोसो दूर असल्याने परिसराचा विकास खुंटला असल्याने प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनीधीवर दुर्लक्षितपणाचे खापर फोडले जात आहे. नानाविध समस्येंची जाणीव ठेवून समस्येंचे निराकरण केल्यास विकास दूर राहणार नाही. मात्र विकास वेडा झाल्याचे चित्र असल्याने विकासाच्या समस्या केव्हा दूर होणार असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू