Today : 05:06:2020


केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरनाच्या विरोधात देशातील आयुध निर्माणीशी संबंधीत ४ लाख कामगारांचा आंदोलनाचा पवित्रा

"२१ ते २३ डिसेंबरला आयुध निर्माणी चांदा येथे तीन कामगार संघटनांचे संयुक्त अधिवेशन"
अतुल कोल्हे, भद्रावती :-  केंद्र सरकार सतत कामगार विरोधी धोरण राबवित असून खाजगीकरनाला प्रोत्साहन देत असल्याने देशातील ४१ आयुध निर्माणी पैकी २५ आयुध निर्माणीमधील व यासंबंधीत क्षेत्रातील कामगार आणि कर्मचारी यांच्या सेवेला धोका निर्माण झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. यामुळे सुमारे ३० हजार कामगारावरती बेरोजगारीची टांगती तलवार कोसळन्याचा धोका निर्माण झाला आहे.
      या सर्व अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी राष्ट्रिय पातळीवरील तीन कामगार संघटना एकत्रीत आल्या आहे. आंदोलनाची दिशा सुनिश्चित करण्याकरीता तीन संघटनांच्या प्रतिनिधिंचे संयुक्त अधिवेशन चंद्रपुर जिल्ह्यातील आयुध निर्माणी चांद येथील कम्युनिटी हॉल येथे येत्या २१, २२, व २३ डिसेंबर २०१७ ला राष्ट्रिय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्पलाईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सी. श्रीकुमार आणि इतर पदाधिकाऱ्यांंनी अधिवेशन आयोजनाविषयी नुकतीच सविस्तर माहिती दिली. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी कलकत्ता येथील ऑल इंडिया डिफेन्स एम्पलॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर फेडरेशन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
     या बैठकीत आयुध निर्माणी आणि संबंधीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे ४ लाख कामगारांवर भारतीय जनता पक्ष प्रणीत केंद्र सरकाराकडून वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात  तिनही संघटनांनी संयुक्त पणे रणशिंग फुंकले आहे. या करीता तिनही कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त कमेटी गठित करण्यात आली आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्पलाईज फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी सी. श्रीकुमार, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी आर. श्रीनिवासन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संघटन सेक्रेटरी साधु सिंह याच्या संयुक्त स्वाक्षरीने २४ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्र सरकारच्या डिफेन्स सेक्रेटरिंना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून संबंधीत कामगारांच्या मागण्या आणि समस्यांचा उहापोह करितांनाच आंदोलनाच्या टप्याबबत केंद्र सरकारला कडविण्यात आले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्य