Today : 04:08:2020


भिसी येथील रास्ता रोको आंदोलन चिघडले (वरीष्ठ अधिकारी नसल्यामुळे शेतकरी संतापले)

पंकज मिश्रा, भिसी (चिमुर) :- चिमुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरीता जिल्हा परिषद चंद्रपुर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गटनेता सदस्य डॉ.सतिश वाऱजूकरांच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांङल्या. यामध्ये प्रामुख्याने भिसी वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपणाचे निविदा पुनश्च काठण्यात याव्या, जंगली जनावरांपासुन होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव व अधिकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाची डिमांड भरताच एक महिण्याच्या आत विजजोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याचे दुरूस्तीसह बांधकाम पुर्ण करून २०१७ ला शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणि देण्याचे आश्वासन लोकप्रतीनिधींनी पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकिय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभुळविहिरा, नवेगांव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपुर, शिवरा, लावारी, इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगल लगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधुस करित असतात त्यामुळे सदर गावांच्या जंगल सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, विद्युत कंपण्यांमार्फत शेतात उभारल्या जाणाऱ्या विद्युत टावर चा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात याव्या या मागण्या आपल्या भाषनातून मांडले आहेत. परंतू निवेदन स्विकारण्यासाठी वन विभागाचे एकही वरीष्ठ अधिकारी उपस्थीत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निवेदन देण्यास नकार दिला व जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी निवेदन घेण्यास येत नाही तो पर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पारिस्थीती चिघळण्याची अवस्था निर्माण झाली आहे.
     या मोर्चा मध्ये दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे तसेच शंभरावर बैलबंडी सहभागी होत्या आहेत, आंदोलन स्थळी अल्पोहार व पाण्याची व्यवस्था होती करण्यात आले आहे तसेच भिसी पोलीसांनी आंदोलन स्थळावरुन दोन किलो मिटर दुर वाहने थांबवली आहे. सध्या ही कोणतेही अधिकारी आले नसल्याने भिसी चौरस्था येथे रास्ता रोको आंदोलन सुरूच आहे. तसेच  डॉ. सतिश वारजूकर यांच्यासह इतर आंदोलकांना पोलीसांनी अटक केली असता इतर आंदोलकांनी पोलीस गाडी समोर उभे राहून गाडी जाऊ दिली नाही, शेवटी पोलीसांनी हतबल होऊन अटक केलेल्या डॉ.वारजूकर सह इतरांना गाडीमधून उतरविले व सर्व आंदोलक परत चौरस्ता इथे रास्ता रोखुन बसले. या आंदोलनात शेतकरी महिलांची उपस्थीती लक्षणीय होती. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli










































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मुल, प्रतिनिधी :-
मुल