Today : 04:06:2020


बोंड अळीमुळे बळीराजावर ओढावले आर्थिक संकट (नुकसान भरपाई द्या.. ताजनेंची कृषी मंत्र्याकडे मागणी)

सैय्यद अमजद अली, गडचांदुर :- बोंड अळीमुळे शेतकऱ्याच्या शेतातील कापसाचे अतोनात नुकसान झाले असुन पिक पुर्ण पणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जिल्ह्यातील बळीराजा अक्षरश: हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे. याची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अॅड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर असुन लवकरच या विषयी सकारात्मक निर्णय घेऊन  शेतकऱ्याना आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले आहे.
     चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवठ करतात. परंतु यंदा अचानकपणे झलेला बोंड अळीचा हमला, बळीराजासाठी मारक ठरला असुन कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट जानवत असल्याने, तसेच हातात आलेले नगदी पिक नष्ट होत असल्याचे चित्र पाहुन बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याना या संकटातुन बाहेर काढण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आशिष ताजने यांनी निवेदना द्वारे कृषी मंत्र्यांकडे केली असुन सकारात्मक भुमिका घेण्याचे आश्वासन  कृषीमंत्र्यांनी दिले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur