Today : 08:08:2020


गडचांदुर तालुका मागणीसाठी धरणा आंदोलनाचे आयोजन

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदुर तालुका झाला पाहिजे... या मागणीला घेऊन दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर रोजी स्थानीक गांधी चौक येथे धरणा आंदोलन आयोजीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तुळशीरामजी भोजेकर होते तर उदघाटन डाॅ.भोयर यांनी केले.न.प. नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, नगर सेविका श्रीमती मोतेवाड, चंद्रभागा कोरवते, डाॅ.चरणदास मेश्राम, संजय उके, सुनिल फुलझेले, अहेमद भाई, सोमा मुन, विठ्ठल कुसळे, देविदास मुन, मधुरकर चुनारकर, रवि पथाडे, खुशाल मेश्राम, लटारी पातुरकर, समितीचे संघटक उद्धवपुरी, सचिव अशोक उमरे इतर प्रमुख्याने उपस्थित होते.
     गडचांदुर तालुका निर्माण व्हावा यासाठी गेल्या बरेच वर्षा पासुन तालुका संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू असुन यंदा टप्प्या, टप्प्याने जन आंदोलनाला सूरूवात करण्यात आली आहे. संघर्षाचा पहिला टप्पा म्हणुन ८ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय राजुरा येथे भव्य संघर्ष यात्रा काढण्यात आली.दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर रोजी धरणा आंदोलन तसेच तीसरा टप्पा २२ डिसेंबर रोजी नागपुर विधानसभेवर भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     उपस्थित मान्यवरांनी तालुक्याची गरज का ? या संबंधी सखोल मार्गदर्शन केले.तालुका घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे निर्धार यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक डाॅ.भोयर तर संचालन व आभार मारोती जुमनाके यांनी केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे