Today : 09:08:2020


वनविभागातील वनरक्षक व वनपाल तांत्रिक कामावर बहिष्काराने १३ कोटी वृक्ष लागवड करिता अडचणी निर्माण होण्याची शक्यता ( १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी असहकार्याची भूमिका घेणार - नितीन कुमरे)

विदर्भ टाईम्स न्यूज /  वनविभागातील वनरक्षक वनपाल त्यांनी त्यांच्या संवर्गाची वेतनश्रेणी सुधारणांसाठी पुकारलेल्या दुसऱ्या टप्यातील आंदोलन तिव्र होण्याची चिन्ह आलापल्ली वनविभागामध्ये निर्माण झाले आहे. आलापल्ली वनविभागातील अहेरी, चामोर्शी, पेरमिली, मार्कडा, आलापल्ली, पड्डीगुडम, घोट परिक्षेत्रात कार्यरत सर्व वनरक्षक / वनपाल यांनी त्यांना वनविभागाच्या वतीने पुरवठा करण्यात आलेले पीडिए व जीपीएस यंत्र परिक्षेत्र कार्यालयात परत करत वनविभागातील तांत्रिक कामावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा होत असल्याने वनविभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.  
     वनविभागाने तिन वर्षा आधी वनविभागाच्या संपूर्ण सांगणी करण्यासाठी मोठया प्रमाणावर निधी खर्च केला असून सध्यस्थितीत वनविविभागातील रोपण, रोपवाटिका, खुप कटाई, मनरेगा, जलयुक्त शिवार योजना आदी सर्व कामे ही पीडीए व जीपीएस च्या माध्यमाने केली जात असून ही कामे वनविभागातील वनरक्षक व वनपाल यांच्या वतीने केली जातात यांचीच पीडीए व जीपीएस वापरावर बहिष्कार टाकल्याने ही सर्व कामे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 
     शासन व प्रशासनाच्या वतीने गाजावाजा करत हाती घेतलेली १३ कोटी वृक्ष लागवड योजने करिता लावण्यात येणारी सर्व रोपे वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये तयार होत असून वनरक्षक / वनपाल यांच्या आंदोलनाने रोपवाटिका बंद होणार असल्याने या महात्मकांशी वृक्ष लागवड योजने करीत रोप मिळणार नाही व त्याचा विपरीत परिणाम या रोजने वर पडणार आहे. त्यामुळे शासन वनरक्षक / वनपाल यांच्या वेतनश्रेणी सुधारणे चा काय निर्णय घेतेयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
     
               "वनरक्षक / वनपाल यांच्या वेतनश्रेणी मध्ये सुधारणा होणार नाही तो परंत आलापल्ली वनविभागामध्ये सर्व तांत्रिक कामकाज कामावर बहिष्कार टाकण्यात आले असून १३ कोटी वृक्ष लागवडी करीत आम्ही असहकार्याची भूमिका घेणार" - - नितीन कुमरे, अध्यक्ष, आलापल्ली वनविभाग महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur