Today : 14:08:2020


रोजंदारी कर्मच्याऱ्यांना कायम करा, भारतीय नगर परिषद कामगार संघ : मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

अतुल कोल्हे - भद्रावती :-  मागील वीस वर्षापासून रोजंदारी काम करणाऱ्या नगर परिषदेच्या कर्मच्याऱ्यांना कायम काराचा निर्णय कार्यान्वित करा, अश्या मागनीचे निवेदन भारतीय नगर परिषद कामगार संघ भद्रावतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. २४ ऑगस्टला  मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पारपडलेल्या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री रंजीत पाटिल, मनिषाताई मैसकर, प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय व नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे आयुक्त विरेंद्र सिंह आणि विधान संघटनांचे पदाधिकारी यांच्या सक्षम झालेल्या बैठकीत २० वर्षापासूनच्या प्रलंबित कार्यरत न. प. मधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्यायिक सेवेत कायम करण्याबाबत असलेले निर्णय जाहिर केला. 
     या बैठकीत सन १९९३ ते २००० या कालावधीत रोजंदारी कर्मच्याऱ्यांना विविध नगर परिषदांमधे समाविष्ट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच नगर परिषद कर्मच्याऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव बक्षी समितीकड़े पाठविन्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. ग्रामपंचायत मधील कर्मच्याऱ्यांना नगर परिषद मधे समाविष्ट करण्यासाठी आराखड़ा तयार करण्याचा तसेच संचालनालयाच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या होत्या.
     कर्मच्याऱ्यांचे पगार देण्याइतपत सक्षम होण्याचा प्रयत्न करावा, यासाठी कराची वसूली करण्यासाठी  कर्मच्याऱ्यांनी व त्यांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, कर्मच्याऱ्यांचा मागण्यासंदर्भात राज्य शाशन सकारात्मक असून, कर्मच्याऱ्यांना वेतनासाठी सहायक अनुदान द्यावे, आश्वाशित प्रगती योजनेचा लाभ,  यासह मुख्याधिकाऱ्यांच्या संवर्गासंबंधीच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक विचारा करण्यात येईल आदि विषयांवर सूचना देण्यात आल्या. हा निर्णय रोजंदारी कर्मच्याऱ्यांसाठी स्वागतार्य आहे. त्या पैकी कही शासनाचे अध्यादेश ( जी. आर. ) निघाले असून रोजंदारी कर्मच्याऱ्यांना कायम करण्याचा निर्णय अजुन पावततो कार्यान्वित झालेला नाही त्यामुळे रोजंदारी कर्मचारी चिंतेत आहे. मात्र  कार्यान्वित करण्यास होत असलेल्या विलंबनामुळे रोजंदारी कर्मच्याऱ्यांचे पूर्ण लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले असून कर्मच्याऱ्यांना कायम करण्याचा निर्णय कार्यान्वित करण्याकरीता आता सुरु असलेल्या हिवाळी  अधिवेशनात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकणाकडे गंभीर्याने लक्ष घालुन रोजंदारी कर्मच्याऱ्यांना न्याय द्यावा असे भारतीय नगर परिषद कामगार संघ द्वारे मागणी करण्यात आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur

"विद्यार्थ्यांचा सत्कार/ संत जगनाडे महाराज फलकाचे अनावरण"
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
जिवनात संघर्ष केल्या शिवाय व जो पर्यंत क