Today : 18:10:2019


स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेत भद्रावती राज्यात अव्वल (देशातील टॉप २० गोल्डन रँकमधे मिळविला प्रवेश)

अतुल कोल्हे - भद्रावती :-  शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेने राज्यातील ४ हजार ४१ शहरांना मागेटाकत स्वच्छ शहर म्हणून अव्वल स्थान पटकाविले आहे. देशात भद्रावती शहर द्वितीय क्रमांकावर असून स्वच्छ शहर अभियानाच्या ३१ डिसेंबर या शेवटच्या दिवसापर्यंत शहर देशात प्रथम क्रमांकावार असेल. असा विश्वास नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी वेक्त केला.
     शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण २०१८ अंतर्गत देशातील नगर परिषदा, नगर पंचायत व महानगर पालिका असलेल्या शहरांमध्ये स्वच्छ शहर सर्वेक्षण ही स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत ४ हजार ४१ शहरे सहभागी झाली आहेत. या अंतर्गत ऑन लाईन तक्रारी करने, मोबाईल मध्ये स्वच्छ्ता अँप डाऊनलोड करुण त्या द्वारे प्रति मोबाईल पाच तक्रारी करने व त्या तक्रारीचे निवारण करने, तक्रारीच्या निवारणानंतर फिडबॅक देने व वोटअप करने अशी स्पर्धेची प्रक्रिया आहे. 
     भद्रावती शहरातील नागरिकांनी मोठ्या संखेनी सहभागी होत प्रतिक्रिया पूर्ण केली. याच आधारे १० डिसेंबर पर्यंत भद्रावती शहराने देशातील टॉप २० या गोल्डन रँकमध्ये प्रवेश मिळविला होता. 
     कोणत्याही शहरावर अन्याय होऊ नये म्हणुन लोकसंखेनुसार पाच लाखांवरिल आणि पाच लाखाच्या आतील लोकसंख्या असलेल्या शहरांचे दोन गट पाडन्यात आले. त्यानुसार १४ डिसेंबर ला भद्रावती शहराने राज्यात प्रथम तर देशात द्वितीय क्रमांक पटकाविला. सध्या आंध्र प्रदेशातील सरायपल्ली  हे शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे.

     "भद्रावती शहरातील नागरिकांनी आमच्या आवाहनाला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या करिता मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वात सर्वांनी परिश्रम घेतले आहे. अशी वाटचाल सुरु राहिल्यास ३१ डिसेंबरपर्यंत भद्रावती शहर देशातून पहिल्या क्रमांकावर येईल" -   अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, नगर परिषद भद्रावती




News - Chandrapur | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli