Today : 05:06:2020


श्रमिक एल्गारच्या आंदोलनामुळे मजुरांना मिळाले मजुरी (आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी के सि सी कंट्रक्शन कंपनीकडून ३ लाख रुपये मजुरी वसूल)

प्रविण गायकवाड, सावली :-  गोसीखुर्द प्रकल्पात काम करणाऱ्या मजूरांची मजूरी देण्यांस के.सी.सी. कंट्रक्शन कंपनी कडून टोलवाटोलवी काही दिवसापासून सुरु होती, सदरचे तिन लाख रूपयाची मजूरी मिळवून घेण्यात श्रमिक एल्गारने पुकारलेल्या आंदोलनामुळे मजुरांना यश आले आहे. काल पासून मूल येथील कार्यकारी अभियंता, असोलामेंढा प्रकल्प कार्यालयात श्रमिक एल्गारने या मजूरांसोबत ठिया आंदोलन सुरू केले होते.
     गोसीखुर्दच्या प्रकल्पात डांबर फिलींगचे काम करणाऱ्या आठ मजूरांना मागील एप्रिल महिण्यापासून मजूरी देण्यास के.सि.सी. कंट्रक्शन कंपनी टोलवाटोलवी करीत होती.  तसेच हे काम कार्यकारी अभियंता, असोलामेंढा प्रकल्प कार्यालयाचे माध्यमातून झाल्यांने मजूरी देण्यांची व्यवस्था सबंधित कार्यालयाने करावी यासाठी कालपासून मजूरांनी श्रमिक एल्गारच्या महासचिव छाया सिडाम, संगीता गेडाम यांचे नेतृत्वात कार्यालयातच ठिया आंदोलन मांडला होता. 
     उपविभागीय अधिकारी खळतकर, तहसिलदार सरवदे यांनी या आंदोलनाला भेट देवून, मजूरांच्या मागण्या रास्त असल्यांचे सांगत जबाबदारी निश्चित करण्याबाबत संबधीताना आदेश देण्यांचे मान्य केले होते. मजूर व श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यानी काल कार्यालयातच मुक्काम ठोकला. अखेर आज कार्यकारी अभियंता बघमार यांनी के.सी.सी. कंट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागपूरवरून बोलावून सदर मजूरांची मजूरी देण्यांस भाग पाडले.
     तसेच सादर मजुरी हि, दोन लाख अट्ठ्यान्नव हजार सदतीस रूपयाचा मजूरीचा चेक घेतल्यानंतर श्रमिक एल्गारने आपले ठिया आंदोलन मागे घेतले. मजूरांची मजूरी काढून देण्यात सहकार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी खळतकर, तहसिलदार सरवदे, ठाणेदार चव्हाण, कार्यकारी अभियंता बघमार यांचे श्रमिक एल्गारने आभार मानले आहे व मजुरांनी मजुरी मिळवून देण्यासाठी श्रमिक एल्गारच्या वतीने आंदोलन केल्याने मजुरी मिळु शकल्याचे मजुरांनी यावेळी बोलून दाखवले व त्यांचे आभार मानले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur