Today : 07:08:2020


चिमुर पंचायत संमती अंतर्गत कोटगावला एकही घरकुल नाही - प्रशासकिय यंञणेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :-   चिमुर पंचायत संमती अंतर्गत अतिदुर्गम असलेले कोटगाव हे गट ग्रामपंचायत आहे. या गट ग्रामपंचायत अंतर्गत एस.सी, एस.टी, ओबीसी तसेच गरजू लाभार्थांना घरकुल मंजुरी करीता ग्रामसभेच्या माध्यमातून मंजुरी प्रदान करण्यात आली. परंतु सन २०१७-१८ ची घरकुल यादी चंद्रपूर जिल्ह्याच्या  ग्रामीण विकास यंञणेनी नुकतीच घरकुल मंजूरची यादी प्रकाशित केली असता, या यादीत कोटगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत एकाही घरकुल लाभार्थ्यांचे नाव नसल्याने कोटगाव गट ग्रामपंचायत बरोबर प्रशासकिय यंञणेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
     कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत ३ गावात एस.सी, एस.टी. व ओ.बी.सी. वर्गवारीत मोडणारे समाज बांधव वास्तव्याने राहतात. तसेच या गावातील बहुसंख्य कुटुंबे अतिशय गरीब असून रोज मोल मजूरी करुन उपजिवीका करणे हा त्यांचा नित्याचा क्रम आहे.
     कोटगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत ज्यांना राहायला घरे नाहीत, किंवा ज्यांची घरे वास्तव्य करण्याच्या लायक नाहीत, अशा लाभार्थ्यांना घरकुल यादी मध्ये ग्रामसभेद्वारा अग्रण्य प्राधान्य देण्यात आले होते. परंतु निकडीची गरज असलेल्या कोटगाव, दापकाहेटी, वगरपेठ येथील सर्व वर्गवारीतील,ग्रामसभा सिफारस पाञ लाभार्थ्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंञणेच्या घरकुल मंजूर यादीत स्थान देण्यात आले नाही. 
     यामुळे कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल सिफारस पाञ लाभार्थ्यांवर अन्याय करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरचं या गावात एकही पात्र लाभार्थी नसेल का ?  कोटगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत एकाही लाभार्थ्यांला घरकुल मंजुर यादी मध्ये स्थान मिळाले नसल्याने यात नेमकी चुक कुणाची आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे व कोटगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करावी, अशी आर्त हाक येथील नागरिकांची आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचि