Today : 04:08:2020


दोन महिन्याच्या चिमुकल्यासाठी हेल्पिंग हँड्स ची आर्थिक मदत

दिपक सुनतकर, अहेरी :-  अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नैनगुंडम गावातील ईश्वर व  रसिकाताई सिडाम (कोलपल्ली) यांच्या दोन महिन्याच्या चिमुकल्याला एका रोगाने ग्रासले असून त्यावर लवकरात लवकर उपचार होंने गरजेचे आहे. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बळ व आरोग्य सेवेबद्दलची माहिती नसल्याने उपचारासाठी अडचन निर्माण होत होती. याबद्दल देवलमरीचे वैद्यकीय अधिकारी, डॉ विशाल येर्रावार यांनी हेल्पिंग हँड्स ला माहिती दिली असता. हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी तर्फे या चिमुकल्याच्या उपचारासाठी चार हजार रूपये तात्काळ देऊन हेल्पिंग हँड्सच्या सदस्या सौ.प्राजक्ताताई पेदापल्लीवार यांच्या कडून एक हजारा ची आर्थिक मदत करण्यात आली.
     तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र देवलमरी यांच्या कडून ही आर्थिक मदत करण्यात आली व पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. पुढील उपचार दत्ता मेघे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे होणार आहे. हा चिमुकला लवकर बरा होवो हिच हेल्पिंग हँड्स कडून प्रार्थना सर्व सभासदाकडून केली गेली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli