Today : 14:08:2020


शेतातील धानाचे पुजणे जाळले.. (कोजबी चक येथील घटना)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- नागभिड तालुक्यातील कोजबी चक येथील शेतमालकाने शेतात धानाचे पिकाचे पुजणे करून ठेवलेले असतांना अज्ञात व्यक्तिने धानाचे पुजणे जाडले असल्याची घटना उजेड़ात आली. सदर शेतमालकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. शेतमालकाने पोलीसात तक्रार दाखल केल्याने तळोधी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोजबी चक येथील शेतमालक किरण केशव शिवनकर यांच्या चार एकर मालकीचे शेतात धानाचे पिक निघाले.नुकतेच कापलेले धानाचे पिक शेतात जमा धानाचे पिक पुजणे करून ठेवले होते.
     अज्ञात व्यक्तीने पुजणे जाळले असल्याचा प्रकार उजेडात आल्याने पोलीसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे शेतकरीवर्ग उत्पन्नात घट झाल्यामुळे विवंचेत आहेत तर एकीकडे विध्नसंतोषी लोक दृशकृत्य करित असल्याचे प्रकार करित असल्याने मनुष्यप्राणीच दुसऱ्याचे नुकसान करण्यास उठला आहे. त्यामुळे माणसाच्या मानुसकिची किव येत आहे. शेतमालकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli