Today : 04:08:2020


सुगत कुटीचा तपोभुमी प्रमाणे विकास करणार : आ.किर्तीकुमार भांगडिया

फिरोज पठाण, चिमूर प्रतिनिधी :-  ज्याप्रमाणे राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा आपण विकास करतोय त्याचप्रमाणे आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी मालेवाडाचा विकास करण्यास आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली. ते आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी भिक्षुसंघ, मालेवाडा आणि बौद्ध पंचकमेटी, मालेवाडा यांच्या वतीने आयोजित धम्ममेळावा व संविधान संस्कृती महोत्सवात बोलत होते. 
     गेल्यावर्षीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आमदार किर्तीकुमार पुढे म्हणाले कि, आपण सर्व भगवान बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचारांवर चाललो तर पांढऱ्या पोशाखधारी पुढाऱ्याची, नेत्यांची काहीच गरज नाही. या भूमीचा विकास करण्याचे जबाबदारी आपल्या सर्वांची असून या भूमीतून भगवान बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाचे घरापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आपण सर्वांना करायचा आहे. या भूमीचा विकास करण्याचे प्रयत्न आजपर्यंत कोणीच केले नाही, परंतु मी विश्वास देतो कि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात याल तेव्हा या भूमीचा विकास झाल्याचे आपणास नक्की दिसेल. 
     राष्ट्रसंताच्या विचारसरणीवर, भगवान गौतम बुद्द्धांच्या विचारसरणीवर, बाबासाहेबांच्या विचारसरणीवर चालण्याचा मी प्रयत्न करतोय आणि माझ्या मतदार संघाला या थोर महात्माच्या विचार सरणीवर चालविण्याचाही मी प्रयत्न करतोय. या भूमीचा कायापालट झाला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, आदरणीय कवाडे सरांनीही या भूमीच्या कायापालटासाठी सहकार्य देऊ केले आहे. महिनाभरात या भूमीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येईल. येथे पाण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, सभामंडप असो, ज्याप्रमाणे गोन्दोडा येथील राष्ट्रसंतांच्या तपोभूमीचा आपण विकास करतोय त्याचप्रमाणे या सुगतकुटीचा  विकास करून देणार त्यासाठी मी वचनबद्ध आहे. आपण माझ्यावर  दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असे ते पुढे म्हणाले.
     यावेळी माजी खासदार आणि विद्यमान आमदार जोगेन्द्रजी कवाडे, जि.प.सदस्य गजानन बुटके, ममता डुकरे, भाजपचे जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, जयंत गौरकार, पंचायत समिती सभापती चौधरीताई, नागदर्शन पिटाळे, खंगार सर, श्रीरामे सर, भैरव पाटील आदि यावेळी मंचावर उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur