Today : 07:08:2020


गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व आबांनी का स्वीकारले ते आज कळले : स्मिताताई पाटील

"दोन दिवसीय व्यस्त कार्यक्रमात सुद्धा प्रत्येकाची भेट"
विदर्भ टाईम्स न्यूज :-  मुक्तीपथ कार्यालय गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्यासाठी आयोजित १६ ते १७ डिसेंम्बर पर्यंत वडसा, गडचिरोली, अहेरी, चामोर्शी असे चार ठिकाणी  "आमचे आबा गेले, पण तुमचे वाचवा"  या विषयावर मार्गदर्शन करून १७ डिसेंम्बर ला सांयकाळी परत जाताना गडचिरोली चे माजी पालकमंत्री आर.आर.पाटील यांची सुकन्या यांनी दोन दिवसात येथील लोकांचा आदर, आपुलकी, प्रेम हे सर्व अनुभवलेले क्षण आठवत आबांनी गडचिरोली चे पालकत्व का स्विकारले ते मला आज कळल्याचे सांगितले.
     १५ डिसेंम्बर रोजी रात्री त्यांचा आगमन झाला त्या दिवशी सर्च मध्ये त्यांनी मुक्काम केला. १६ डिसेंम्बर रोजी १० वाजता गडचिरोली येथील महिला महाविद्यालयाला भेट देऊन युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले. १२ वाजता वडसा येथे मुक्तीपथ मार्फत आयोजित कार्यक्रमाला उपस्थितांना मार्गदर्शन केले, ३.३० ला सर्किट हाऊस ला सर्वांसोबत भेटीघाटी केल्या त्यानंतर पारडी गावचे सरपंच संजय निखारे यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेऊन पोलीस रेस्ट हाऊस ला रात्री विश्रांती घेण्यात आले. परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ डिसेंम्बर रोजी सेमाना येथे दर्शन घेऊन अहेरी राजनगरीत माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरी सर्व सदस्यांसोबत भेटी घेतले मग संत मानवदयाल आश्रम शाळेत आयोजित कार्यक्रमात उपस्थित झाले त्यानंतर परत धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतले आणि चामोर्शी येथील सभेला उपस्थितांना मार्गदर्शन करून गडचिरोली कडे प्रस्तान झाले एवढ्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी आबांचा कार्यकर्त्यांना विसरले नाही परत जाता-जाता सर्किट हाऊस मध्ये तब्बल एक तास सर्वांना भेटून त्या आणि त्यांची माता प्रस्तान झाले.
     गडचिरोली च्या प्रत्येक कार्यक्रमात जेणे काही आबांचाच मार्गदर्शन सुरू आहे की, काय ? असे भासत होते. ज्या मधुर आवाजात आबा लोकांना मार्गदर्शन करायचे त्याच आवाजात आज त्यांची सुकन्या सुद्धा जिल्ह्यातील तमाम आबांचा चाहत्यांना आपल्या मधुर वाणीतून मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सभेत त्या धर्मरावबाबा आत्राम असल्यामुळेच माझ्या बाबांना जिल्ह्यात मुक्कामाणे राहून विकासात हातभार लावण्यात यश आल्याचे बोलून दाखविले. गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे मी स्वतः जरी बघितले नाही पण भेटायला येणारे सर्व आबांचे कार्यकर्ते आणि इथल्या जनसामान्य जनतेचा वाणीतून दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असे मोठ-मोठे पद भूषवून सुद्धा भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेला नेता म्हणून आबांची ओळख आहे यापेक्षा आणखी काय हवं आहे असेही त्या म्हणाल्या जर माझ्या बाबांना तंबाखू चे व्यसन नसते तर इथे मी नाही तुमचे आबा असते, म्हणून कोणीही व्यसनाचा अधीन न होता आपल्या कुटुंबासाठी जगावे असेही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दोन दिवसीय व्यस्त कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनी दिलेलं प्रेम कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
       या दोन दिवसीय प्रत्येक कार्यक्रमात मात्र, आबांसोबत जसे बाबा असायचे त्याचप्रमाणे सुमनताई आणि स्मिताताई पाटील यांच्या सोबत गडचिरोली चे बांधकाम सभापती सौ. भाग्यश्रीताई हलगेकर होत्या.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
निकृष्ट बांधकाम पुन्हा उत्कृष्ट करणेसाठी झोपा क़ाढा (ठिय्या) आंदोलन

2018-01-08 | News | Chandrapur