Today : 08:08:2020


विज्ञान प्रदर्शनात नवरगावच्या विदयार्थ्यानी मारली बाजी

अमर बुद्धारपवार, सिंदेवाही :-  ४३ वे सिंदेवाही तालुका विज्ञान प्रदर्शन दिनांक १६ व १७ डिसेंम्बर २०१७  ला  " ग्रामीण विकास विद्यालय कळमगाव (गन्ना)" येथे थाटात पार पडले. या विज्ञान प्रदर्शनात "लोकसेवा हायस्कुल नवरगाव" येथील ३ विद्यार्थी व १ शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले. विज्ञान प्रयोगात, वाहतूक व दळणवळण या विषयांतर्गत लोकसेवा हायकुल नवरगाव येथील ९ व्या वर्गाचा विद्यार्थी समिक्षक शिवशंकर काऊलकर याला द्वितीय क्रमांक, निबंध स्पर्धेत १० व्या वर्गाचा विद्यार्थी हेशांत पप्पू देशपांडे याला द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत १० व्या वर्गाची विद्यार्थिनी फरजिना आसिफ खान हिला तृतीय क्रमांक तर शाळेचे विज्ञान शिक्षक मनोज बारसागडे यांना शैक्षणिक साहित्य निर्मितीवर तृतीय क्रमांक मिळाला.
     विज्ञान प्रयोगाचे परीक्षण एम. एन. पठाण, पी. एन. लाडी, पी. डी. घाटे यांनी तर बक्षिस वितरण जि. प. सदस्य माणिकराव घोडमारे, पं. स. सदस्या नलिनी चौधरी, डॉ. राजेश डहाके, प्राचार्य एन. एम. सोनूले याचे हस्ते करण्यात आले. शाळेचे विज्ञान शिक्षक मनोज बारसागडे व शिक्षिका नलिनी मोटघरे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विदयार्थ्याचे कौतूक  केले जात आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur