Today : 14:08:2020


कोंबडा बाजारावर धाड़ सव्वा तिन लाखांचा ऐवज माल जप्त

अतुल कोल्हे, भद्रावती :-  तालुक्यातील सावरी जंगल परिसरात काही लोक कोंबड्यांची झुंज लाऊन जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरुण भद्रावती पुलिसांनी सापळा रचुन दिनांक १७ ला दुपारी १ वाजता धाड़ टाकली. त्या धाडीत आरोपी संजू नत्तू कुरेकार (४२) मनोरा, प्रभाकर रामाजी कारमिंगे (४९) आष्टा, सुनील तुकाराम विरुटकर (४६) विसापुर, विलास आडकुजी नन्नावरे (३६) वाघोली, मंगेश शालिक सावसाकडे (२३) वाघोली, आनंद वात्थु जिवतोड़े (४४) वाघोली, प्रफुल बाबा टोंगे (२२) वायगाव, स्वप्निल आनंद हरड़े (२५) चंदनखेड़ा, दौलत कवडु कौरासे (५२) निंबाडा, शालिक चंपत गजभे (४०) वाघोली व रामकिशन चंपत गजभे (५३) यांना अटक करण्यात आली. घटनास्थळावरुण आठ जिवंत कोंबडे (चार हजार रूपये), दोन मृत कोंबड़े, चार कात्या (८००), सहा मोबाईल (१६ हजार रूपये), सहा दुचाकी (तिन लाख रूपये) असा एकूण तीन लाख पंचेविस हजार आठशे वीस रुपयांचा ऐवज जप्त केला. 
     सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक नियती ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंग राजपूत, उपविभागीय पोलिस अधिक्षक वरोराचे प्रताप पवार, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बी.डी.मडावी, स.पो.नी. आळंदे, पो. उप. निरीक्षक बुरांडे, तसेच शेरकी, इनमुलवार, ढवस, वर्हाड़े, गुरनुले, प्रधान व शाबाज आदींनी केली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur