Today : 12:08:2020


मोजक्या दुकानदारांमुळे आल्लापल्ली ग्रामपंचायत हस्तबद्ध झाले (आल्लापल्ली बसस्टँड प्रकरणात हताश झाले ग्रामपंचायत)

विदर्भ टाईम्स न्यूज / आल्लापल्ली ग्रामपंचात ही गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठया ग्रामपंचायत मधून १ ग्रामपंचायत आहे. अल्लापल्लीतील सध्याची लोकसंख्या २५ जहारहून अधिक असल्याची ऐकण्यात येते. तसेच गाव मोठा तर समस्याही मोठेच असतात यातच आल्लापल्ली गावातही मोठं - मोठे समस्या नेहमीच निर्माण होत असतात. गावात विविध पक्ष असल्याने जो - तो ग्रामपंचायतवर आक्रमक होऊन राजकिय दबाव निर्माण करून पाहिजे तसे काम करून घेतो. 
     तसेच आल्लापल्ली गावाकरिता २ मोठ्या समस्या वर्षानू वर्षा पासून आहेच यावर अजून पर्यंत कोणताही पर्याय काढला नोव्हता यात १ म्हणजे गावात बसस्टँड नाही, गावातील लोकसंख्या २५ हजाराहून अधिक आहे व आल्लापल्ली मुख्यगाव असल्याने जवळच्या गावातील लोकांची रहदारी दिवसन दिवस वाढत आहे. बसस्टँड नसल्याने प्रवासीयांना बसण्यासाठी सुद्धा पाहिजे तशी सुविधा नाही, स्त्रियांना प्रसाधान गृह नाही, पुरुषांना प्रसाधान गृह नाही, बसस्टँडवर पिण्याच्या पाण्याची सोया नाही असेच अनेक समस्यने ग्रस्त असे आल्लापल्ली ग्रामपंचायतचे बसस्टँड आहे. 
     तसेच २ समस्या म्हणजे गावातील लोकांना पुण्याचे पाणी नाही, काही वर्षा पूर्वी गावात ग्रामपंचायत मार्फत नळ दिले जात होते, पण ग्रामपंचायतने नियोजीत बिल न भरल्याने दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागाने गावातील नळ सेवा बंद केली व ग्रामपंचायत याचे खापर मागची सरपंच/ सदस्य व सचिवावर फोडले व सध्या स्थितीत नळ बंद असल्याने आजच्या कालावधीत गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.
     अहेरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यामध्ये दाखल घेत आल्लापल्ली गावासाठी बॅस्टेन्ड व नळ योजना मंजूर करू अशे आश्वासन दिले होते. जिल्ह्या परिषद निवडणूक दरम्यान आल्लापल्ली गावासाठी बसस्टँड मंजूर झाले आहे अशे प्रचारादरम्यान त्यांनी सांगितले होते व आज गावासाठी बसस्टँड मंजूर झाले आहे, पण बसस्टँड परिसरात झालेल्या अतिक्रम ही ग्रामपंचायत उठवूशकत नाही. अतिक्रमण धारकांनी याला राजकीय वातावरण देऊन मोजक्या ३० अतिक्रम धारकांसाठी संपूर्ण गावातील २५ हजार लोकांचा विकासावर आळा घालण्यात आला आहे असे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur