Today : 14:08:2020


नवरगावात माकडांनी घातला धुमाकुळ (माकडाला पडविण्याचा प्रयत्न केल्यास मनुष्यावर माकडाचा धावा)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :-  नवरगाव वनक्षेत्रातील माकडे गावात शिरकाव करित असल्याने माकडाच्या धुमाकुळीमुळे नागरिकांना नाहक त्रासासोबत आर्थिक नुसकानीचा सामना करावा लागत आहेत. मात्र एका माकडाने असा कहर केला आहे की, त्या माकडाला पडवून लावण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीच्या अंगावर माकड येवून पडत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवरगाव उपवनक्षेत्रात हिस्त्र पशुसह वन्यप्राण्याचा मोठया प्रमाणात वावर आहे. शेती परिसरात हिस्त्र पशुसह रानडुकराचा त्रास सहन करावा लागतो. मात्र या जंगलातील माकडांनी मोठया प्रमाणात मोर्चा वळविला असल्याने माकडामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माकडे धुमाकुळ घालत असल्याने घरी लावण्यात फळे, भाज्या, फुले यांचे नासाडी करतातच त्यातल्या त्यात वाळवन टाकलेले कडधान्य व अन्य खादय पदार्थ फस्त करित असल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. घरावरील कौलावर उडया मारत असल्याने कवेलूची नुकसान मोठया प्रमाणात होत आहे त्यामुळे गोर-गरिब नागरिकांना नुकसानी सामना करावा लागत आहे. वनविभागाच्या कायद्यानुसार माकडाला मारल्यास कायदयानुसार शिक्षेला सामोरे जावे लागणार म्हणून विपरीत कृत्य करण्यास नागरिक घाबरत असल्याचे बोलले जात आहे.
     माकडाला पडविण्याचा प्रयत्न केल्यास जमावातील काही माकड पडविणाऱ्या व्यकीवर धावा करतांना नागरिकांना आढळून आले आहे. असाच प्रत्यय माकडाबाबत घडल्याने वनविभागास कळविण्यात आले तेव्हा वनरक्षक शेख घटना स्थळी दाखल झाले व त्या माकडाला पडविण्याचा प्रयत्न केला असता वनविभागाच्या कर्मचात्यावरही त्या माकडाने धावा केल्याने वनविभागाला त्या माकडाची माकडचेष्टा लक्षात आली आहे. सिंदेवाही वरून वनविभागाची एक टिम पाठविण्यात आली. मात्र त्यांना उशिर झाल्याने तो माकड आढळला नाही. माकडाच्या उपद्रवापाई नवरगाव वासीय हैरान झाले असल्याने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकात जोर धरत असून त्या उपद्रवी माकडाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांत केली जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत