Today : 06:12:2019


सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा... धानाला प्रति क्विंटल ३५०० रुपये हमीभाव देण्यात यावे - राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार निवेदन

अमर बुद्धरपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यात तांदूळ हे प्रमुख पिक घेतले जाते परंतु यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याने पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव पिकाचे कमी उतपन्न व हमी भावाचा अभाव यामुळे सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी व जनता अडचणीत सापडलेली असून आर्थिक समस्येला समोरे जावे लागत आहे. त्याबरोबर तालुक्यात इतरही समस्यांना जनसामान्यांना तोंड द्यावे लागत आहे. सद्यस्थितीत तालुक्याच्या परिस्थितीचा विचार करत तालुक्यातील विविध समस्याने ग्रासत आहे. यात प्रामुख्याने सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, धानाला प्रति क्विंटल ३५०० रुपये हमीभाव देण्यात यावे, मावा तुळतुळा रोगाच्या प्रदूर्भावणे एकरी ७ ते ८ पोते उत्पन्न होत असल्याने पिक विमा लागू करण्यात यावा, केशरी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य देण्यात यावे, शिधापत्रिका वरील बंद केलेली साखर सुरू करण्यात यावी, तालुक्यातील गळमौशी येथील ठेकबाई तलावात गोसिखुर्दचे पाणी सोडण्यात यावे, सिंदेवाही येथील वनविभागाचा देपोमधून सरपनाकरिता जळाऊ इंधन देण्यात यावे, तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करण्यात यावे. तसेच अनेक मागण्याचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सिंदेवाहीचे तहसीलदार यांना देण्यात आले. 
     या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संदीप गड्डमवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष बाबुरावजी गेडाम, सिंदेवाही तालुका अध्यक्ष दामोदर नन्नावार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, सुनील काळे, मंगेश पोखार, चांद्रभूषण जैस्वाल, प्रफुल महाजन, अभिजीत मुप्पीडवार, मनोज सैनी, बाबूलाल डांगे, राजू ताडाम, अनंता निकोडे, सुधाकर धरत, मंगेश मडावी, अंबादास ठोसे, प्रकाश बोरकर, वसंत लांजेवार, अनिल जनबंधु, मुजिफ शेख, देविदास चौधरी हे उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघ