Today : 08:08:2020


अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकृती उत्तम (स्‍वरयंत्रावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया, काही दिवस व्हॉईस रेस्टवर)

अतुल कोल्हे, भद्रवती (वरोरा) :-  अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या स्‍वरयंत्रावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया झाली असुन त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना डॉक्टरांनी काही दिवस बोलण्यास मनाई केली आहे. नागरीकांच्या शुभेच्छा आणि प्रेमाच्या बळावर सुधीर मुनगंटीवार लवकरच बोलणे सुरु करतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांनी दिली आहे. 
     तसेच चंद्रपुर सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वरयंत्रावर सुज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना व्हॉईस रेस्ट चा सल्ला दिला होता. त्‍यानंतर डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार मुंबईत दिनांक १२ डिसेंबर रोजी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली असुन त्‍यानंतरचे सर्व रिपोर्टस सुध्‍दा नॉर्मल आहेत. शस्‍त्रक्रियेनंतर काही दिवस बोलणे पूर्णपणे बंद ठेवण्‍याचा सल्‍ला तज्ञांनी दिला आहे. मात्र व्हॉईस रेस्ट नंतर ते पुर्ववत बोलणे सुरु करतील. त्यांची प्रकृती उत्तम आहे. काळजी चे काहीही कारण नाही. कुटुंबियांची  साथ, असंख्य नागरिकांच्या शुभेच्छा, ज्येष्ठांचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, लवकरच त्यांचे बोलणे सुरु होईल, अशी माहिती  भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur