Today : 06:12:2019


शशांक वानखेडे प्रो कबड्डी खेळाडू याची आमदार चषक वरोरा मध्ये दंगल (कबड्डी खेळाडूंसाठी आमदारानी दिली वरोरा शहरामध्ये नवसंजिवनी)

अतुल कोल्हे, भद्रावती (वरोरा) :-  वरोरा शहर येथील भव्य विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धचेे आयोजन करण्यात आले होते. पुरुष व महिला कबड्डी खेळाडूंनी कौशल्य दाखवून वरोरा वासीयाचे मन मोहून टाकले. तसेच काल झालेल्या अंतिम सामन्यादरम्यान  नागपूर येथील एकलव्य संघानी शिवाजी सेलू वर्धा संघावर विजय नोंदविला आहे. दरवर्षी वरोरा शहरांमध्ये विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सलग तीन दिवस हे सामने  दिवस रात्र वरोरा शहरांमध्ये सुरू होते. 
     तसेच विविध शहरांमधून आलेल्या खेळाडूंचे स्वागत वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रातले आमदार बाळू धानोरकर यांनी केले. यावेळी लाखो रुपयांची रोख बक्षिसे  खेळाडूंना देण्यात आले. रविवारी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये नागपूरकरांनी बाजी मारली. अंतिम सामन्यांमध्ये चॅम्पियन चे चॅम्पियन शशांक वानखेडे यांना बजाज कंपनीची बाईक घेऊन सन्मानित करण्यात आले. एकलव्य संघाला  प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपयांचे देण्यात आले. वरोरा शहरामध्ये पहिल्यांदाच भव्यदिव्य कबड्डी खेळाचे सामने वरोरा वासियांना पहावयास मिळाले.
     यावेळी स्पर्धकांना बक्षीस देण्यासाठी भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्रातले आमदार बाळू धानोरकर, भद्रावती नगरपालिका नगराध्यक्ष अनिल धानोरकर,  नरेंद्र नेमाडे, प्रकाश बाबू मुथा,  दिलीप रामेडवार, विशाल बदखल, काशीफ खान, सागर वजे , राजू चिकटे, मनीष जेठानी, बाबा आगलावे, पुरुषोत्तम खिरटकर, राजू महाजन या मान्यवरांची उपस्थित कार्यक्रमाला लाभली होती.
     वरोरा  येथील स्वर्गीय उत्तमराव मेश्राम मैदानावर गर्दी झाल्याने वरोरा पोलीस, जय हिंद क्रिडा मंडळ कार्यकर्ते, बाहेरून बोलावलेले गार्ड व स्वतः आमदार साहेबांनी हि गर्दी सांभाळण्यासाठी प्रयत्न केले हे विशेष.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli