Today : 08:08:2020


३४ वर्षापासून रखडलेला (हुमन प्रकल्य) मोजतोय शेवटची घटीका, शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न: भंगले (३४ कोटीचा प्रकल्प २ हजार ५०० कोटीच्या घरात)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :-  चंद्रपूर जिल्हयासाठी भूषण ठरणारा प्रकल्य म्हणून या सिंचन प्रकल्पाकडे बघीतले जात होते. सन १९८२ मध्ये या प्रकल्पाची मुहुर्त मेढ रोवण्यात आली. मागील ३४ वर्षापासून रखडला असून या प्रकल्पावर २१० कोटीहून अधिक खर्च झाला आहे. मात्र पाण्याचा एकही थेंब जमा न होता आजच्या घडीला प्रकल्पाची किंमत अंदाजे २ हजार ५०० कोटी रूपयाच्या घरात पोहचली आहे. सिंचन प्रकल्प शेवटची घटका पाहत असल्याचे चिन्ह दिसत आहे. बफर झोन राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडून अभिप्राय प्राप्त न झाल्याने प्रकल्प ३४ वर्षापासून रखडला असल्याने परिणामी शेतकऱ्यांच्या हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे.
     सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडाजवळ उमा नदीवर सिंचनाचा मोठा प्रकल्प होणार हाेता. या हुमन नदी प्रकल्पा मुळे जिह्यातील १६० गावातील शेतकऱ्यांची ४६११७ हेक्टर शेती क्षेत्रावर सिंचन सोय उपलब्ध होणार होती. चंद्रपूर शहरासाठी पाणी, ताडोबा व्याघ्र प्रकल्प वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध उपलब्ध दुर्गम भागातील लोकांचा विकास होवून नक्षलवादी हालचालीवर अंकुश बसेल असा या प्रकल्प निर्मिती मागे उद्देश हाेता.
     प्रकल्पाच्या कामाची सुरवात सन १९८२-८३ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ हुमा नदीवर झाली. पोचमार्ग व त्यावरील पुल, सिंदेवाही, नवरगाव, पुरकेपर येथे स्थायी अस्थायी वसाहती व कार्यालय बांधकाम करण्यात आले. परंतू कामाची मंजूरी मिळताच हा प्रकल्प वनविभागाच्या कचाट्यात अडकला  न्यायालयीन लढाई नंतर न्यायालयाने प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे सन २००९ मध्ये सिमांकनास सुरवात करण्यात आली. पुन्हा प्रकल्पाचे घोडे अडल्याने काम ठप्प झाले आहे. लाखो रुपयाची साहीत्य भंगारात विकल्या गेली परिणामी शासनाचे कोटयावधी रुपये पाण्यात गेले. हुमन प्रकल्पामुळे सिंदेवाही, मूल, पौभुर्णा, सावली या तालुक्यातील १६० गावातील ४६११७ हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येवून सिंचनाचा प्रश्न सुटणार होता, मात्र वनविभागाची आडकाठी की राज्य शासनाची उदासीनता ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने सध्यातरी या परिसरातील शेतकऱ्यांचे स्वप्न अंधातरी असल्याने शेतकऱ्यांचे हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli

" जखमी जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३