Today : 10:04:2020


डेड लाईन संपली माञ तालुक्यातील खड्डे तसेच (अधिकाऱ्यांवर कारवाई केंव्हा) जनतेचा सवाल

सैय्यद मूम्ताज अली, गडचांदुर :- राज्यातील रस्त्यांचे खड्डे १५ डिसेंबर पुर्वी भरले जाईल, या डेड लाईनसह कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, अशी घोषणा राज्याचे महसुल मंञी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. हि डेड लाईन संपवुन आठवडा उलटत आहे, माञ अजुन ही कोरपना तालूक्यातील रस्त्यातील खड्ड्यात साधी माती सुध्दा टाकण्यात आली नाही. यामुळे मंञी महोदयांनी केलेेल्या घोषणे प्रमाणे संबंधित विभाग अधिकाऱ्यांवर कारवाईचे सञ केव्हा सुरू होणार अशी विचारना आता तालुक्यातील जनता करीत आहे.
     कोरपना तालुक्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली असुन खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे, हेच कळेनासे झाले. सा.बा.विभागाचे ग्रामीण भागाकडे अक्षरशः दूर्लक्ष केल्याचे दिसत असुन गडचांदुर वरुन देवाडा, पाटण, अंतरगाव, या रस्त्यात पडलेले खड्डे नागरिकांना डोकेदुखी व ञास दायक ठरत आहे. या रस्त्यावरुन दररोज ये - जा करणाऱ्यांचे जीव टांगनीला लागल असुन अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गडचांदुर - भोयगाव रस्त्या बद्दल न बोललेलेच बरे.या रस्त्यावर अनेक वर्षा पासुन खड्ड्यांचे साम्राज्य असुन अनेक आंदोलने झाली, नागरीकांनी उपोषण करुन शासनाचे याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुद्धा केले माञ प्रत्येक वेळी निव्वळ आश्वासने देण्यात आली. या रस्त्यासाठी करोडोंच्या निधीची मंजुर झाल्याचे सांगण्यात येते. माञ अजुन कामाला सुरूवात काही झालेली नाही. निव्वळ जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यचा एक कलमी कार्यक्रम सुरु असुन चंद्रकांत पाटलांनी कितीही दावे केले तरी या तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती बदललेली नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-