Today : 03:07:2020


शेतशिवारात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह (मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यात)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :-  सिंदेवाही ते नवरगाव रस्त्यावरील लाडबोरी जवळील शेत शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सिंदेवाहीत खळबळ उडाली आहे. सिंदेवाही पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार सिंदेवाही येथील खाती मोहल्ल्यातील मृतक एकनाथ मनोहर बोरकर  (वय ४० )  हा सोमवारला कामावर जातो म्हणून कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडला तो सायंकाळ पर्यत घरी परतला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केली  मात्र थांगपत्ता लागला नाही. सकाळला त्याचा मृतदेह लाडबेारी रोडवरील स्व:ताच्या शेतात सकाळच्या सुमारास आढळून आला असून सदर घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन केले आहे. 
     तसेच सिंदेवाही पोलीसात मर्ग दाखल केला असून मृत्यूचे नेमके कारण सध्या कळू शकले नाही असे पोलीसांचे म्हणणे आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ईश्वर लेनगुरे करित आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन सं