Today : 15:08:2020


त्यांच्या थांबणाऱ्या पायांना मिळाली गती आणि ते चालु लागले.. आ.किर्तिकुमार भांगड़िया यांनी केली खाजगी निधीतुन तीन लाख रुपयांची शस्त्रक्रिया

फिरोज पठाण, चिमूर :- साधारण माणसात देव शोधून त्यांची सेवा करा म्हणजे पुण्य तुम्हाला लाभेल. या म्हणी प्रमाणे ब्रम्हपुरी येथील ३५ वर्षीय राहुल हाडगे यांचे हिप रिप्लेसमेंट तथा कोजबी येथील ५३ वर्षीय दयानंद गोपाले यांचे "नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया" चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगड़िया यांच्या आर्थिक मदतीने झाली आहे. राहुल हाडगे हे यांचे काही दिवसापूर्वी अपघात झाले होते. त्यांचे डाव्या पायांचे हिप त्यात ख़राब झाले. त्यांचे नागपूरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. नंतरचा खर्च हिप जॉइंट रिप्लेसमेंटचा न पेलवनारा असल्याने त्यांनी शस्त्रक्रिया केली नव्हती. पहार्णी ता. नागभीड़ चे भाऊचे सक्रीय कार्यकर्ते लहू भाजिपाले यांचे समोर भाऊने त्यांची व्यथा मांडल्या असता लाखो रुपयांच्या खर्चाला भाऊ एका शब्दात त्यांना होकार दिला.
     तसेच दयानंद गोपाले यांच्या बाबतीत ही तेच झाले वया नुसार शरिरातील अवयव हळू - हळू निकामी होत असते. यांचे डाव्या पायाचे गुडघे ख़राब झाल्याने त्यांना चालायला मोठी अड़चण निर्माण झाल्याने ते घरीच असायचे, कोजबी येथील काही कार्यकर्ते तथा त्यांनी स्वता भाऊ पुढे आपली कैफियत मांडली. लगेच त्यांनी यांना पण हो म्हंटल.
     या दोघांचे कुठलीही आर्थिक अड़चन भासु नये व थांबलेल्या पायांनी पुन्हा चालावे करिता आ. बंटीभाऊ यांनी स्वतःच्या  पैशाने यांच्या शस्त्रक्रिये करिता महागड़े इनप्लांट उपलब्ध करुन या दोन्ही गरजू रुग्नांणा आयुष्य जगण्याला बळ देऊन आनंद निर्माण करून दिलाय. समाज कारणातून राजकारण व  राजकारणातून समाजकारण तर सगळेच करतात पण दुःखात साथ देणारे व कामी पळणारे क्वचीतच. या दोन्ही परिवाराने आमदार किर्तिकुमार भांगड़िया यांचे मनापासुन आभार मानले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli