Today : 08:08:2020


त्रयस्थ पक्षाकडून विकास कामाच्या चौकशीची मागणी (सार्वजनिक बांधकाम विभागाची टोल वाटोलवी)

"दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडे नगरसेवक ढाकुनकरांची तक्रार"
प्रतिनिधी, चिमूर :-  चिमूर नगर परीषदेच्या निर्मीती नंतर नगर परिषद क्षेत्रात पायाभुत सुविधा योजना, नागरी सहाय्य अनुदान अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत विविध कामे झाली असुन ही सर्व कामे निकृष्ठ दर्जाची असल्याबाबत तसेच अंदाजपत्रकास बगल देऊन काम झाले असल्याची तक्रार व सर्वसाधारण सभेचा ५ नोहेम्बंर २०१७ चा ठरावा प्रमाणे या सर्व कांमाची त्रयस्थ पक्षाकडून चौकशी करण्याची मागणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडे नगरसेवक विनोद ढाकुणकर यांनी केली आहे.
     चिमूर नगर परीषदेच्या क्षेत्रातील सर्व प्रकारची पायाभुत व नागरी सेवा अंतर्गत विविध विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असुन कामाचा दर्जा खालावला आहे. तसेच हि कामे करीत असताना नगर परिषदेच्या अंदाजपत्रकाला फाटा देण्यात आले. यामुळे संबधित कंत्राटदारांचे बिल अदा करू नये अशी मागणी होत असतांनाही नगरसेवकांच्या तक्रारी आणि मागण्यांना केराची टोपली दाखविन्यात आली. एका वर्षातच नाल्या आणि रस्त्यांना भेगा पडल्या असुन याचा त्रास सामान्याना होत असल्याने संबधित सर्व कामांची त्रयस्थ पक्षाकडून चौकशी करण्याची मागणी केल्या जात आहे.
     चिमूर नगर परीषदेच्या दिनांक ५ नोहेंबर २०१६ च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक १७ प्रमाणे नगर परिषद क्षेत्रात सार्वजनीक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट काँक्रीट व नाली बांधकामाची चौकशी करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच ७ नोहेबंर २०१७ च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ३० प्रमाणे सार्वजनीक बांधकाम विभागा अंतर्गत सुरू असलेल्या कामाचे देयके संबधित प्रभागातील नगरसेवक यांना विचारात घेऊन अदा करण्याचा ठराव घेण्यात आले. या ठरावाची प्रत संबधीत सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या तरी विभागाने टोलवा टोलवीच केल्याने नगर सेवक विनोद ढाकुणकर यांनी अधिक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नागपूर यांचेकडे या सर्व कामांची त्रयस्थ पक्षामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur