Today : 04:08:2020


शेणगांव येथे बिटस्तरीय बालक्रिडा स्पर्धा संपन्न

अतुल कोल्हे, भद्रावती :- पंचायत समिती चंद्रपुर अंतर्गत घुग्घुस बिटाच्या शालेय बालक्रिडा तथा सांस्कृतिक स्पर्धा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेणगांव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. त्या कार्यक्रमाचे उद्घाटक देवराव भोंगळे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते झाले असून अध्यक्ष स्थानी वंदना पिंपळशेंडे सभापती व ब्रिज भुषण पाझारे समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपुर यांच्या उपस्थित पार पडली. या उद्घाटन समारंभाला नितू चौधरी जिल्हा परिषद सदस्य, सविता कोवे, शालू शिंदे पंचायत समिती सदस्य, निर्मलाताई मिलमिले सरपंच, घुलाराम धांडे उपसरपंच, जगन्नाथ बादरकर अध्यक्ष शाळा समिती, मायाताई पिदुरकर, मंगेश चटकी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, बंडूजी चटकी अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी आदी उपस्थित होते.
     या तीन दिवसीय समारंभात २४ शाळेतील सहाशे विध्यार्थी ११३ शिक्षकांनी सहभाग घेतला या स्पर्धेत जनरल चॅम्पियन मारडा (मोठी) मैदानी चॅम्पियन उसगाव या शाळेंनी पटकविल्या. या सर्व खेडाळुना बक्षिस वितरण समारंभात वितरक ब्रिजभूषण पाझारे, समाजकल्याण सभापती चंद्रपूर, नितु चौधरी जि प सदस्या, शालु शिंदे पंचायत समिती सदस्य, धनपाल फटिंग, शिक्षक विस्तार अधिकारी यांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
     या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घुग्घुस बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग, केंद्रप्रमुख सुधाकर कातकर, नानाजी गिरडकर, यजमान शाळेचे मुख्यध्यपक कु. वर्षा पेंदापल्लीवार, संता निखाडे, लटारी मोहितकर, सुभाष गेडाम, ललिता उपरकर, अशोक राऊत, विपीन धाबेकर यांनी जबाबदारी पार पाडली. शेणगाव ग्रामपंचायत सरपंच तथा सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, संभाजी ब्रिगेड, गुरुदेव सेवा मंडळ तसेच गावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
     या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अशोक राऊत क्रिडा सचिव तर आभार सुधाकर कातकर केंद्रप्रमुख यांनी केले.   
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथी