Today : 18:10:2019


प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन अनुषंगाने शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा

अतुल कोल्हे, भद्रावती :-  प्राथमिक शिक्षकांच्या ज्वलंत मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक ची शालेय शिक्षण मंत्री विनोद तायडे यांच्याशी स्करात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार प्राचार्य अनिल सोले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू, प्राथमिक अध्यक्ष राजेश सुर्वे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शुक्रवार दिनांक १५ डिसेंबरला पटवर्धन मैदान नागपूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांच्या ज्वलंत मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे धरणे आंदोलन शिक्षक परिषद पदाधिकारी वेणूनाथ कड, राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वात संपन्न झाले तर चंद्रपूर जिल्ह्यातून प्रकाश चुनरकर, विलास बोबडे, संजय लांडे, किशोर मुन यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षक आंदोलन सहभागी झाले होते. 
     तसेच सहभागी शिक्षकांचे अमोल पेठे चंद्रपूर यांनी आभार मानले व धरणे आंदोलनात राज्यभरातील विविध जिल्ह्यातील परिषदेचे पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. धरणे आंदोलनात प्रामुख्याने सन २००५ नंतरच्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी जुनी पेंशन योजना लागू करणे, संगणक परिक्षा वेतन वाढ, वसुलीची कार्यवाही रद्द करणे, शाळांची विज देयक घरगुती दराने आकारणे, सर्व प्रकारची ऑनलाइन कामे रद्द करणे, वरिष्ठ श्रेणी, निवड अन्यायकारक शासन आदेश रद्द करणे, ३० सुप्टेंबर २०१७ च्या पटसंख्या निर्धारणावर प्राथमिक शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांचे समायोजन करणे याशिवाय अन्य महत्वपूर्ण मागण्या अनुषंगाने धरणे देण्यात आले. धरणे आंदोलनात भेट देणारे आमदार संजय केळकर यांना चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक वेतनवाढ वसुली प्रकरणी चुनरकर सहसरचिटणीस यांनी निवेदन दिले.
     चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणक अहर्ता नसलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या वेतनवाढ वसुली होत असल्यासंदर्भात वित्त सचिव आर.ए.राजीव यांना निवेदन देण्यात आले. त्याच प्रमाणे शालेय शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मुख्यमंत्री कार्यालय येथे सुद्धा निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री यावेळी श्रीकांत भारतीय कार्यालय यांच्याशी चर्चा झाली होती.
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli