Today : 04:08:2020


सामूहिक शौचालय लोकार्पण सोहळा संपन्न

अतुल कोल्हे, भद्रावती (वरोरा) :- १६ डिसेम्बर २०१७ रोजी शनिवार ला जी एम आर वरोरा एनर्जी लि वरोरा आणि जी एम आर वरलक्ष्मी फाउंडेशन, वरोरा द्वारा सामूहिक व ९१ वैयक्तिक शौचालयाचा लोकार्पण सोहळा आमदार बाळु धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे येथे पार पडला. जीएमआर वरोरा एनजी लि वरोरा द्वारा सामाजिक कार्य अंतर्गत वरोरा तालुक्यातील आठ गावामध्ये शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरण व स्वावलंबन हे कार्यक्रम चालविले जात आहे. या गावामध्ये भारत सरकार द्वारा चालविण्यात येणाऱ्या स्वच: पाणी, ग्राम सफाई, आरोग्य इत्यादी कार्याचे आयोजन केल्या जात आहे. याच अनुषंगाने जीएमआर वरोरा एनर्जी लि वरोरा अंतर्गत एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन वरोरा तालुक्यातील चिनोरा, डोंगरगाव आणि नायदेव या तीन गावातील बी पी एल यादीत येणाऱ्या १५१ लाभार्थीना वयक्तिक शौचालयाचे बांधकाम करून देण्यात आले. 
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातुन आमदार बाळू धानोरकर यांनी जी एम आर एनर्जी लि वरोरा चे समाजकार्य अशाच प्रकारे चालू राहण्याकरिता मनपूर्वक शुभेच्या दिल्या तसेच समाजातील मागास वर्गाच्या प्रगतीकरिता जास्तीत जास्त कार्य करण्याचा साला दिला उपस्थित नागरिकांना स्वचतेचे महत्व सांगून उघड्यावर शौच करण्याने सामाजिवनावर व मानवी आरोग्यवर कसे विपरीत परिणाम होतात यावर आळा घालण्याची नितांत गरज होती ती या माध्यमातून पूर्ण झाली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पस्ट केले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur