Today : 04:08:2020


विद्यार्थीच्या सार्वांगीण विकासासाठी क्रिडा व सांस्कृतिक संमेलनाची गरज - अजय कंकडालवार, उपाध्यक्ष जि.प. गडचिरोली

"तालुकास्तरिय बाल क्रिडा संमेलनाचे उदघाटन्"
प्रकाश दुर्गे, अहेरी :- शालेय शिक्षणा बरोबर विद्यार्थीचा सार्वांगीन विकास करायचा असल्यास क्रिडा व सांस्कृतिक संमेलनाची अत्यंत आवश्यकता आहे. या करीताच जि.प.गडचिरोली अंतर्गत निधीची तरतूद करुन शालेय बाल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येत आहेत. या संमेलनात सर्वच शाळांनी सहभागी होऊन विद्यार्थीना संधी उपलब्ध करुण द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
     पंचायत समिती अहेरी अंतर्गत तालुकास्तरिय बाल क्रिडा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन टेकुलगुडा (महागाव) येथे आज दिनांक २ डिसेम्बर रोजी करण्यात आले. या संमेलनाचे उदघाटन् जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेखा आलाम सभापती पं.स. अहेरी ह्या होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती सुनिता कुसनाके जि.प.सदस्या, अनिता आत्राम जि.प.सदस्या, रुषी पोरतेट जि.प.सदस्य, राकेश तलांडे उपसभापती प.स.अहेरी, छाया पोरतेट प.स.सदस्या, योगेश्वरी मोहुर्ले, गिता चालुरकर, प्रशांत ढोंगे, भास्कर तलांडे, राकेश पन्नाला, सरपंच श्रीहरी मुक्ता आलाम, साहाय्यक संवर्गविकास अधिकारी एम.डी.सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे, मारोती करमे उपसरपंच, अशोक येलमुले सरपंच, संतोष देव्हारे, प्रमोद रामटेके, नागेश कन्नाके, संजय पोरतेट, पुष्पा आत्राम, बंडू मडावी, कुसूमशहा ईष्ठाम इत्यांदी दरम्यान उपस्थित होते.
     तसेच या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रुषी पोरतेट यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, जिवनात खेळाला  महत्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातूनच चांगले खेळाडू पुढे येत असतात. आपल्या जिल्हातील आदिवासी विद्यार्थी खेळात निपून असतात त्यांना केवळ चांगल्या मार्गदर्शनाची व संधी उपलब्ध करुण देण्याची गरज असल्याचे रुषी पोरतेट यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
     या प्रसंगी साहाय्यक गटविकास अधिकारी एम.डी.सोनटक्के, तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व दिनांक २० ते २२ पर्यंत या तीन दिवसीय संमेलनात तालुक्यातील बाराही केंद्रातील पाचशे च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धत आपले कलागुण सादर करणार आहेत. 
     तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यानी केले तर संचालन संजय कोमकुंटीवार, शिला सोमनकर यांनी केले तसेच उपस्थितीतांचे आभार अशोक दहागावकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रेंद्र प्रमुख सर्वश्री सुधाकर टेकुल, एस.बी.अली, बि.एस. निखोडे, सी.ए.मेश्राम, आर.एम.रच्चावार, ए.टी.व-हाटे, व्ही.आर.मोतकुरवार, एल.आर.गद्देवार, डी.आर.नंदगीरवार, पी.आर.माकोडे, एस.बी.बोम्मावार, सुधाकर घोसरे, क्रिडा संमेलनाचे कार्यकारी सचिव श्रावन दुर्गे, कार्यकारी सचिव  किशोर सुनतकर, सहसचिव अशोक दहागावकर, संजय पुज्जलवार, राजू शेंडे, बापू आत्राम तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षक, व्यवस्थापन समिती पदाधिकारी व टेकुलगुडा येथील सर्व ग्रामस्थाचे सहकार्य मिळाले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli