Today : 14:08:2020


उडेरा शासकीय आश्रम शाळेत भोंगळ कामकाज (जिल्ह्याचे पालाकमंत्री यांना गावकऱ्यांचे निवेदन सादर)

"अधिकाऱ्यांकडे कित्येक तक्रार करूनही कोणतीही दाखल घेतली नाही.. अधिकाऱ्यांचाही हातभार असल्याची गावकऱ्यांची तक्रार" 
विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधील उडेरा अंतर्गत असलेले पितृछाया बहुउद्देशीय शिक्षण संस्था, भंडारा या संस्थे द्वारे श्री स्वामी समर्थ अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सुरु असून त्या शाळेच्या अनेक गंभीर तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा करूनही शाळेतील शिक्षक व अधिकाऱ्यावर कोणतेही योग्य कार्यवाही आजतागायत झालेली नाही. गावकऱ्यांच्या म्हणणे नुसार यात अधिकारी व कर्मचाऱ्याचे समानव्येव असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. 
     तसेच बेकायदेशीर पद्धतीने सन २०१४-१५ मध्ये बोगस विध्यार्थी दाखवून शासनाकडून हजारो रुपयाची उचल या आश्रम शाळेचे अधिकाऱ्याने केली आहे.  याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्याकडे केली असता, या बाबत कोणतेही आक्षेप किंवा कार्यवाही केलेली नाही. अवैध वृक्षतोड करून वनजमिनीवर बांधकाम केल्याबाब तक्रार मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे केली असता वनविभागाकडूनही कोणतीही कार्यवाही आजतागायत केली नाही. तसेच जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल हि करण्यात आलेली आहे याबाबत दिनांक ०३ सप्टेंबर २०१५ रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली येथे करण्यात अली असून आद्यपही याची चौकशी करण्यात आलेली नाही.  नियमानुसार शासकीय आश्रम शाळेत रात्रौच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नसते पण या आश्रमात कोणत्याही वेळेस प्रवेश होत आहे या आश्रमात कित्तेक मुली असतात कोणतीही वरदा झाल्यास जबाबदार कोण ? नियमबाह्यरित्या शासकीय आश्रमशाळेत रिक्त असलेले पदाकरिता पुरुष वार्डर ठेवण्यात आले. वस्तीगृहात मुली असल्याने त्यांची सुरक्षेची जबाबदारी कोणाची तसेच या वस्तीगृहात अज्ञातवक्ती वेळप्रसंगी बाहेरील आवारात असतात याबाबत स्थानिकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्याकडे तक्रार केली असून या वर कार्यवाही झालेली नाही. अशा विविध तक्रारी करून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्याकडून आजतागायत नियमबाह्य कार्यवाही झाली नसल्याने जिल्ह्याचे आदिवासी विकास मंत्री तसेच पालकमंत्री यांना स्थानिक गावकर्यांने निवेदन देऊन या बाबत बेकायदेशीर रित्या काम चालत असलेल्या कामकाजावर योग्य कार्यवाही करावी असे म्हटले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli

" जखमी जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३ रा.अहेरी असुन त्याला नागपूर मध्ये हलविन्यात आले "
विदर्भ टाईम्स न्