Today : 03:07:2020


गडचिरोली येथे २५ व २६ डिसेंबर २०१७ ला ग्रामसभांचा राष्ट्रिय संमेलन

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील काही ग्रामसभा एकत्र येवून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार अभियान व अखिल भारतीय आदिवासी महासभा यांच्या सहयोगाने “ग्रामसभांचा राष्ट्रिय संमेलन द्वारा २५ व २६ डिसेंबर २०१७ ला गडचिरोली येथे आयोजीत करीत आहेत. दिनांक २४ डिसेंबर १९९६ ला पेसा कायदा पारित झाला. पेसा कायद्याच्या निर्मितीला २० वर्ष व वन अधिकार कायदा अमलात येवून १० वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने सदर राष्ट्रिय संमेलन आयोजित केलेले आहे.
     गडचिरोली मधील ग्रामसभांनी पेसा व वन अधिकार चा वापर करून केलेल्या विविध प्रयत्नांची इतर क्षेत्रातील / राज्यातील ग्रामसभांना माहिती व्हावी, सोबतच इतर क्षेत्रात / राज्यात सुरु असलेल्या ग्रामसभांच्या प्रक्रियांना समजून घेणे; पेसा कायद्याच्या २० वर्ष व वन अधिकार कायद्याच्या १० वर्षाच्या अंमलबजावणी ची समिक्षा करणे, ग्रामसभांचे अनुभव, वन संसाधन व्यवस्थापन प्रक्रिया, ग्रामसभांच्या अधिकारांना प्रभावित करणाऱ्या प्रशासनिक -संरचनात्मक अडचणी ओळखून त्यावरील कृतीकार्यक्रम व समोरील संघर्षाची आखणी करणे इत्यादी मुद्यांवर सदर संमेलनामध्ये चर्चा केली जाईल.
     सदर संमेलनामध्ये गडचिरोली जिल्ह्यात पेसा व वन अधिकारची अंमलबजावणी करून ग्रामसभा मजबुतीकरणाचे उदाहरणे निर्माण केलेल्या ग्रामसभा व कायद्यांच्या निर्मिती / अंमलबजावणी मध्ये बहुमुल्य योगदान दिलेल्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.
     सदर संमेलनाला करिता गडचिरोली जिल्ह्यातील पेसा अंतर्गत व सामूहिक वन अधिकार मान्य ग्रामसभा, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ग्रामसभा, देशातील इतर राज्यातील ग्रामसभा प्रतिनिधी, पेसा-वन अधिकार- ग्रामसभा व जल-जंगल-जमीन च्या संघर्षा सोबत काम करीत असलेल्या जन संगठना, संस्था, व्यक्ती, अभ्यासक इत्यादी सहभागी होत आहेत.
     गडचिरोली जिल्ह्यातील पेसा अंतर्गत ग्रामसभा, सामुहिक वन अधिकार मान्य ग्रामसभा यांनी सदर दोन दिवसीय संमेलना मध्ये आपल्या ग्रामसभेचे दोन (शक्यतोवर एक महिला) प्रतिनिधी पाठवून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. सोबतच पेसा व वन अधिकार कायद्याला घेऊन काम करीत असलेल्या जन संघटना, संस्था, अभ्यासक, व्यक्ती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
     सहभागी प्रतिनिधीची निवास व भोजन व्यवस्था सामूहिक पद्धतीने करण्यात येईल, सदर संमेलन हे विविध ग्रामसभा एकत्र येवून आयोजित करीत आहेत, तरी सदर संमेलनाला यशस्वी करण्यासाठी ग्रामसभांनी व जनतेने सर्वोपरी मदत करावी अशी विनंती आयोजन समितीच्या वतीने एड. लालसू नागोटी (प्रतिनिधी भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समिती, व जिल्हा परिषद सदस्य), बाजीराव उसेंडी (इज्जत से जिने का अधिकार अभियान), हिरालाल येरमे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी महासभा) यांनी केले आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर