Today : 14:08:2020


बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियनातंर्गत उदरनिर्वाहसाठी कोणतीही रक्कम दिली जात नाही - अरविंद ठाकुर, महिला बालकल्याण अधिकारी

"अफवांवर विश्वास ठेवू नये रिसोड महिला बालकल्याण अधिकारी अरविंद ठाकुर यांचे आवाहन"
महेंद्रकुमार महाजन, रिसोड :-  केंद्र शासनाच्या  महिला व बालकल्याण  विभागा अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत मुलींच्या उदरनिर्वाहसाठी कोणतीही रक्कम देण्याची शासनाची योजना नाही. तरी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने रिसोड महिला बालकल्याण अधिकारी रिसोड अरविंद ठाकुर यांनी केले आहे. 
     जनतेनी अशा अफवांवार विश्वास न ठेवता, अशा प्रकारच्या योजनेसाठी अर्ज विक्री करण्याचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिप काढून नजीकच्या पोलीस  स्टेशनला कळवा आणि अशा धोखेबाज लोंकावर पोलीसातर्फे एफ आय आर दाखल करून कार्यवाही करण्यात येईल.तरी याची संबंधीत फॉर्म विक्री करणाऱ्या  झेरॉक्स सेंटर किंवा व्यक्तींनी नोंद घ्यावी व अशा प्रकारचे बनावट फॉर्म विक्री करून जनतेची दिशाभूल करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
     केंद्र शासनाच्या  महिला व बालकल्याण  विभागाच्या नावाने बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानातंर्गत मुलींच्या उदरनिर्वाहसाठी दोन लाख रूपयांची  मदत देण्याच्या सबबीखाली शहरात बनावट अर्जांची सर्रांस विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील  झेरॉक्स सेंटर मध्ये २० रूपयांत संबंधीत अर्जाची मोठया धडयाक्यात विक्री सूरू असल्याचे निदर्शनास आले आहे.  शहरात वय वर्ष ६ व त्यापुढील युवतींनी  केंद्र शासनाकडे  बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत अर्ज सादर केल्यास त्यांना शैक्षणिक खर्चासह उदरनिर्वाहसाठी दोन लाख रूपयांची मदत मिळणार असल्याचा अफवा जिल्हयात असून बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतू शासनाची अशा प्रकारची कोणतीही योजना नाही.तरी जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
News - Washim | Posted : 2017-12-20


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनखेडा गावात सोमवार