Today : 08:08:2020


देलनवाडीतून ५ लाख ९० हजाराची अवैद्य दारू जप्त आरोपी फरार (चंद्रपूर एल.सि.बी.ची कार्यवाही)

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-  सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देलनवाडी गावात गुरुवार १.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर एल.सी.बी. पथकाने धाड टाकली असता ५९ पेटया देशी दारू जप्त करून सिंदेवाही पोलीसात गुन्हा दाखल केला असून आरोपी जालंधर डोमा गायकवाड हा फरार झाला असल्याचे सिंदेवाही पोलीसांनी सांगितले आहे.
     तसेच चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी होवून दोन वर्षाचा कालावधी होत असतांना देखील सिंदेवाही तालुक्यात अवैद्य दारू विक्रिला ऊत आला असून कारवाई होवूनही अवैद्य दारूविक्रेते अवैध दारू व्यवसाय सोडतांना दिसत नसल्याने कुठे तरी पाणी मूरत असल्याचे बोलले जाते. चंद्रपूर एल.सी.बी. पथकाला गुप्त माहिती मिळताच देलनवाडी येथील जालंधर गायकवाड याचे घरी धाड टाकली असता ५९ पेटया देशी दारू जप्त करण्यात आली. यात एकूण मुद्देमाल ५ लाख ९० हजार रुपयाचा आहे. हि कारवाई चंद्रपूर एल.सी.बी. पथकाचे फौजदार पद्माकर भोयर यांनी केली आहे. तसेच याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पडाल करित आहेत.
News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli