Today : 04:08:2020


आधी पगार द्या नंतरच मशिनरी हलवा.. मशिनरी हलविन्याचा कंपनीचा प्रयत्न (वेकोलीतील खाजगी खान कामगारांचा एल्गार)

भद्रावती, अतुल कोल्हे  :-  कामगारांचा तीन महिन्याचा पगार न देता जुना कुनाडा कोळसा खानीतून आपल्या मशिनरी अन्यत्र हलविन्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनियरींग प्रावेट लिमिटेड कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हानुन पाडला. सदर घटना दिनांक २१ ला खान परिसरातील आवारात घडली. वेकोलिच्या माजरी क्षेत्रातील जुना कुनाडा खानितील उत्खननाचे काम धनसार इंजिनियरिंग प्रा.लि.कंपनीला देण्यात आले होते. त्यांच्या कामाला १६ महिने पूर्ण झाले असून कोळसा उत्खननाचे काम आणखी १९ महिने बाकी होते. 
     मात्र ३१ नोव्हेंबर ला सदर खानित भुस्खलन होऊन अपघाताची घटना घडली. या अपघातात ६ कामगार जखमी झाले होते तर कंपनीच्या अनेक मशिनरी आजही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आहेत. या अपघाता नंतर सदर खान हि बंद अवस्तेत असुन या कंपनित जवळपास ५५० कामगार कार्यरत असुन आजपर्यंत ते कंपनीच्या हजेरी पटावर नियमीत सह्या करीत होते. दरम्यान वेकोलीचे डि.जी.एम.एस. या अधिकाऱ्याने खानीची पाहणी करुण या वर्षात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश सुरक्षेच्या दृष्टीने काढल्याने सदर कंपनीने या खानित असलेली त्याची यंत्रसामग्री अन्यत्र हलविन्यासाठी आज दिनांक २१ ला मोठ - मोठी वाहने आणली ही माहिती मिळताच कामगारांनी घेराव घालुन कंपनीला सामग्री व वाहने नेन्यास मज्जाव केला हे बघुन कंपनीने पोलिसांची मदत मागितली मात्र कामगारांनी कामगार नेते उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात कंपनीतल्या वेकोलीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आम्हाला तीन महिन्यांच्या पगार द्या नंतरच येथुन मशनरी हलवा असा पवित्रा घेतला मात्र बैठकीत दोन महिन्याचा पगार देण्यास कंपनी तयार झाली मात्र कामगार आपल्या तिन महिन्याच्या पगाराच्या मागणीवरच कायम राहिले त्यामुळे चर्चा विस्कटली.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्या वारिष्टानशी चर्चा करुण मग निर्णय घेऊ असा पवित्रा घेतला मात्र कामगार दिवसभर कंपनीच्या आवारात ठिया मांडून बसले होते.

               "कामगारांची तीन महिन्याची पगाराची मागणी न्यायिक असून जो पर्यंत कामगारांना तिन महिन्याचा पगार मिळत नाही तोपर्यंत कंपनीला मशनरी हालऊ देणार नाही गृहराज्यमंत्र्याशी चर्चा करुण कामगारांना त्याचा न्याय मिळऊन देऊ"    -   उमेश बोढेकर, ( भाजपा कामगार आघाळीचे नेते )
News - Chandrapur | Posted : 2017-12-21


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli

" जखमी जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३ रा.अहेरी असुन त्याला नागपूर मध्ये हलविन्यात आले "
विदर्भ टाईम्स न्यूज / गडचिरोली 
अहेरी : अह..