Today : 04:06:2020


वाचन अभिरुची घडायला वाचन सिद्धांत निर्माण करणे गरजेचे:- डॉ.राजन गवस यांचे प्रतिपादन

"मराठी विभाग आयोजीत राष्ट्रीय चर्चासत्र" 
नवरगाव, अमर बुध्दारपवार :-   वाचन व अभिरुचीवर जी चर्चा केली जाते त्यात वाचक हे घटतो आहे, असे बोलले जाते मात्र ते चुकीचे असून वाचक वर्ग वाढतो आहे. महाराष्ट्राचे पुणे, मुंबई व नागपूर येथील स्वतःला वाचक समजून वाचक वर्ग मंदावली आहे, अशी भाषा मर्यादित लोक करतात. मात्र ग्रामीण भागाचा विचार करून लक्षात घेतले असता वाचक मोठ्या प्रमाणात आहेत, हे त्यांच्या वाचनाच्या पद्धतीने अभिरुची ध्यानात येते अभिरुची घडायला वाचन सिध्दांत निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बिजभाषण करतांना डॉ.राजन गवस यांनी आपल्या वक्तव्यात व्यक्त केले आहे.
     तसेच श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगावच्या वतीने आयोजीत विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत व मराठी विभाग आयोजीत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.सुषमा करोगल (बडोदा) यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सतीश बडते (मराठी विभाग प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद), डॉ.प्रमोद मूनघाटे (मराठी विभाग, नागपुर), बिजभाषण डॉ. राजन गवस (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), डॉ.सुरेश बाकरे होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य सदानंद बोरकर आदी मंडळी उपस्थित होते.
     या प्रसंगी डॉ.राजन गवस पुढे बोलताना म्हणाले कि, ज्ञानी लोकांना वाचन म्हणजे रचना आहे. तेव्हा वाचनाच्या रचना आपल्याला कडत नाही. मूल्यराशीच्या गोष्टी करू लागले. त्यामुळे खेड्यातील दुर्लक्षित वर्ग निर्माण केला गेला आहे. त्यादृष्टीने त्याच्याकडे बघितले जाते. भाषिक निरक्षरता पसरल्याने अभिरुची घडायला वाचन सिध्दांत निर्माण करने गरजेचे आहे. नव्या अभिरुची व बदलता वर्ग निर्माण होत चालला असून वाचकवर्ग हा मोठया प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी उदघाटक सुषमा गरोगल व प्रमुख अतिथी डॉ. सातिश बडवे यांनी अभिरुची आणि बदलता वाचकवर्ग यावर मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरेश बाकरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. गजानन कार्तलवार यांनी केले. तसेच सूत्रसंचालन तुषार चांदवडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. संजय नाकाडे यांनी मानले कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्य प्राध्यापकवर्ग पाहुणे मंडळी, विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli