Today : 08:08:2020


अल्पसंख्यांकांचा विकास प्रवाहात सहभाग वाढवा (शासनाकडे मागणी)

गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-  केन्द्र व राज्य शासन अल्पसंख्यांक कल्याणासाठी प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रम राबवित आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या क्षेत्र विकासासाठी योजना आहे. रोशनी नवी दिशा, कौशल्य विकास, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळा कडून बिज भांडवल ५० हजार पर्यंत छोटया उद्योगासाठी कर्ज, महिला गृह उद्योग व समुह व्यवसायासाठीची योजना आहे. महिला साक्षिकरणासाठी उपक्रम असले तरी ग्रामीण भागात चित्र वेगळेच आहे.
     तसेच गेल्या ३ वर्षात मौलाना आझाद आर्थाक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्जा व्यतिरिक्त इतर कोणतीच योजना राबविल्या जात नाही. अनेक योजना दुर्लक्षीत आसून कौशल्य विकास व रोशनी कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याने बेरोजगारीच्या संख्येत कमालीची भर पडत आहे. वस्तीगृहा मध्ये मुलींना शिक्षणासाठी संधी दिली गेली मात्र त्याचा लाभ मुस्लिम समाजाच्या मुलींना होत नाही. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी  शिष्यवृत्ती पासून वंचित आहे. शासन स्तरावर निधी अभावी क्षेत्र विकास कामांचे प्रकरण प्रलंबित असून निधी उपलब्ध झालेला नाही. अनेक योजना समनव्य अभावी रखडले आहे. 
     अशा या समस्या लक्षात घेऊन जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांच्यासह अशफ़ाक हुसैन, अ.रफ़ीक, जहुर भाई, नासीर शेख, मोशादाब अन्सार अली, शाहीद परवेज, मिनाज अहेमद, इमरान मिर्जा इत्यादींनी ना.विनोद तावडे, अल्पसंख्यांक विकास मंत्री ना. दिलीप कांबळे, सामाजीक न्याय राज्यमंत्री यांची आमदार अॅड. संजय धोटे यांच्या उपस्थितीत भेट घेऊन अल्पसंख्याक समाजाच्या अडचणी जाणून घ्यावे व शासनाने मागण्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर अल्पसंख्यांक कल्याण समिती व अल्पसंख्यांक जिल्हा आयोग समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करुण दरमहा अल्पसंख्यांक योजनेचा आढावा घ्यावा, क्षेत्र विकास निधी अतंर्गत शादी खाना, वाचनालय मुस्लिम दफ़नभूमी येथे रस्ते व कम्पाॅऊंडची कामे प्राधान्याने करण्या करीता शासनाने ग्रामीण व शहरी भागासाठी अर्थ संकल्पीय वार्षीक तरतुद करावी, मौलाना आझाद विकास मंडळाच्या कर्ज प्रकरण शिष्यवृत्ती कौशल्य विकास लाभार्थ्यांचा जिल्हा निहाय उद्दिष्ठ ठरविण्यात यावा, मुस्लीम विद्यार्थ्यांचा आय. टी.आय. मध्ये प्रवेश संख्येत वाढ करावी, डॉ.ज़ाकीर हुसैन मदरसा आधुनिकरण योजना, प्रभावीपणे राबविण्यात यावे, वक्फ़ बोर्डच्या जमिनीवरील अतिक्रमण व बेकायदेशीर ताबे हटविण्यात यावे, मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजीक विकासासाठी शिक्षण आरक्षण संरक्षण या करीता शासनाने विकासाच्या प्रवाहात सहभागी करण्यासाठी धोरण तयार करावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. 
     तसेच यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय शासन घेईल, समस्या सोडविण्यासाठी विभाग निहाय अल्पसंख्यांक मेळावे घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे शब्द मंत्री महोदयाने दिले. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शासन जनता व समाजाच्या कल्याणासाठी असून समाज शिक्षणासाठी संघटीत पणे पुढे येण्याची गरज आहे.शिक्षणा शिवाय समाजात प्रगती व परिवर्तन शक्य नाही या साठी सामुहीक रित्या सर्व संघटनांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर