Today : 09:08:2020


आदिवासी स्नेहसम्मेलन व शहिद विरांचा स्मृती सोहळा

चिमूर, फिरोज पठाण :-  जागतीक आदिवासी समाज जांभुळघाट व्दारा आयोजीत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३, २४ डिसेंबर ला पहांदीपारी कुपार लिंगो देवस्थान जांभुळघाट येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या अनुसंघाने २३ डिसेंबर शनिवारला रात्रो आठ वाजता विदर्भस्तरीय सामुहिक गोंडी नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्य डॉ.सतीश वारजुकर, कार्यक्रमाचे उद्घघाटक जि.प.सदस्य तथा समाजकल्यान व महिला बालकल्याण सदस्य ममता डुकरे व सह उद्धाटक चिमुर पंचायत समितीच्या सभापती विद्या चौधरी व कार्यक्रमाचे उपाध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेसचे सरचीटनीस तथा जिल्हा परिषद चे सदस्य गजानन बुटके व महा.रा. सह. संस्था संघ पुणे चे संचालक घनश्याम डुकरे उपस्थित राहणार आहेत.
     तसेच प्रमुख अतिथी चिमुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माधव बिरजे, जि.म. सह.बँक चंद्रपुर माजी अध्यक्ष संजय डोंगरे, प. स. उपसभापती शांताराम शेलवटकर, प स सदस्य भावणा बावणकर, रोशन ढोक, सरपंच वैशाली कन्नाके, टेकाम, राजु कापसे आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यकमाच्या दुसऱ्या दिवसी रविवार २४ डिसेंबरला सकाळी रॅली, क्रांतिवीर बिरसा मुंडा मुर्तीचे अनावरण आदिवासी कार्यकर्ता नागपूर दिनेश बापुराव मडावी यांचे हस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे ध्वजारोहन माजी पोलीस निरीक्षक पंजाबराव मडावी यांचे हस्ते होणार आहे. दुपारी मार्गदर्शन कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे.
     या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिमुर आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम, उपसरपंच दिगांबर गोगले, ग्रा.प. सदस्य स्नेहा कोवे, चिमूर ता. अध्यक्ष नामदेव आळे, सुरेश परचाके, मनोज मेश्राम, दादा गजभे, एच ए सिडाम, हरगोवींद मेश्राम,एकनाथ गोंगले आदी उपस्थित राहणार आहेत.
     या कार्यक्रमास परिसरातील आदिवासी, मुलनिवासी, बहुजन समाजाच्या नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक बिरसा मुंडा पहांदी पारीकुपार लिंगो शाखा जांभुळघाट यांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनखेडा गावात सोमवा