Today : 08:08:2020


उद्योजकांनी ग्रामीण भागात उद्योग स्थापन करून रोजगार वाढवावा :- आ.मितेश भांगडीया

चिमूर, फिरोज पठाण :-   चिमूर विधानसभा क्षेत्रातील भिसीे येथे विठ्ठल रुखमाई जिनिंग ऍण्ड प्रेसिंगचे उदघाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार मितेशजी भांगडीया यांचे शुभ हस्ते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी संबोधीत करतांना  आमदार मितेशजी भांगडीया म्हणाले कि, उद्योग स्थापन करणे हे सोपे काम नाही परंतु उद्योजकांनी ग्रामीण भागात उद्योग स्थापन करून ग्रामीण भागातील तरुणांना तेथेच रोजगार मिळवून द्यावा. सरकारने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करु इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. याचा उद्योजकांनी फायदा घ्यावा.संचालक मंडळाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देउन परमार्थ साधावा असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी बंधूंना व जिनींगच्या संचालक मंडळाला यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
     यावेळी संबोधीत करतांना आ.किर्तीकुमार भांगडिया म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना सक्षम करणार आहे. भिसी येथे जिनींगच्या सोईमुळे मतदार संघात तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना योग्य मोबदला मिळावा आणि सोयीचे व्हावे म्हणून जिनींग उभारण्यात आलेली आहे, ते पुढे म्हणाले कि, चिमूर मतदार संघात नवीन - नवीन उद्योग धंदे उभारणीस प्राधान्य देण्यात येईल, लवकरच येथे एका दुध डेअरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार बँक ऑफ महाराष्ट्रने याही प्रकल्पाला सहकार्य करावे.  
     तसेच सूक्ष्म सिंचन योजने अंतर्गत जवळपास ७५००  हेक्टर क्षेत्र शेतकरी बांधवाना शेती सिंचनासाठी पाणी पुरवण्याचे प्रयत्न आहे. शेतकरी बांधवांना कृषी विभाग कडून क्रॉप पॅटर्न उपलब्ध होणार आहे. जेणे करून ते जमिनीची प्रत पाहून योग्य पिक घेऊ शकतील. यासाठी पिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजनही करण्यात येईल, तसेच भिसी बस स्टँडचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले असून जनतेची मागणी असलेल्या ठिकाणी बसस्टँड होईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांनी शेतकऱ्यांचे व संचालक मंडळाचे आभार मानले.
     या प्रसंगी वसंत वारजूरकर, अरुण कबाडे, माधव बिरजे, नंदू गावंडे, बकारामजी मालोदे, जिल्हा परिषद सदस्या ममता डुकरे, पं.स.सदस्य प्रदिप कामडी, विजय घरत, मनोहर मुंगले, बापूरावजी बोमेवार, गरीबाजी निमजे, किशोर मुंगले, सुनील जावडेकर, मोरेश्वर झाडे, गोपाल बलदुवा, रमेश बानकर, ईश्वर झाडे, सचिदानंद लाखे व चिमूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-22


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur

"विद्यार्थ्यांचा सत्कार/ संत जगनाडे महाराज फलकाचे अनावरण"
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
जिवनात संघर्ष केल्या शिवाय व जो पर्यंत काटे टोचन..