Today : 08:08:2020


बिटस्तरीय शालेय बालक्रिड़ा स्पर्धा तथा सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन (तालुक्यातील २१ शाळा घेणार सहभाग : राजेंद्र पाटील, केंद्र प्रमुख

भद्रावती, अतुल कोल्हे  :-   पंचायत समिती, बिट - भद्रावती अंतर्गत बालकांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा व कलागुणांच्या अविष्काराची संधी मिळावी. या करीता बिटस्तरीय शालेय बालक्रिड़ा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक २७, २८ व २९ डिसेंबर २०१७ ला जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कुनाडा येथे करण्यात आले आहे.
     या कार्यक्रमाचे उदघाटन २७ डिसेंबर ला सकाळी ११.०० वाजता होत असुन कार्यक्रला उदघाटक म्हणुन सौ. अर्चना जिवतोड़े (सभापती जिल्हा परिषद चंद्रपुर), कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. विद्या कांबडे (सभापती पंचायत समिती भद्रावती), विशेष अतिथी श्री नागोबा बहादे (उपसभापती प. स. भद्रावती), प्रमुख अतिथी श्री अनिल धानोरकर नगराध्यक्ष न. प. भद्रावती, श्री सुदर्शन तुपे गट विकास अधिकारी प.स. भद्रावती, सौ. सुनंदा कुळमेथे अध्यक्ष शा. व्या. समिती कुनाडा हे लाभनार असुन सांघीक क्रिडा स्पर्धा दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत तथा शिक्षक वृंद, शाळा चिरादेवी तर्फे स्नेहभोजन ५ ते ६ आणि सांस्कृतिक कार्यक्रम (फँन्सी ड्रेस, स. गायन, वै. नृत्य) त्यांच प्रमाणे दिनांक २८ डिसेंबरला संगीत स्पर्धा व सायं. ६.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन २९ डिसेंबर २०१७ ला होणाऱ्या बालक्रिड़ा स्पर्धेचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा बक्षिस वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले असुन या सोहळ्याचे उदघाटक म्हणुन श्री.विनोद घोडे प्रा. कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय गवराळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुधिर सातपुते नगर सेवक न. प. भद्रावती हे लाभणार आहे.
     तसेच हा मोहत्सव पार पडण्या करीता श्री सुनील झोडे विस्तार अधिकारी (शिक्षण ), श्री राजेंद्र पाटील केंद्रप्रमुख - भद्रावती, श्री अनिल केराम प्र. केंद्र प्रमुख - ढोरवास, श्री गजेंद्र घोडे क्रीड़ा सचिव, श्री सुरेश पेटकर क्रिडा सहसचिव, श्री राजु चौधरी क्रिडा कोषाध्यक्ष, श्री बाबाराव ढेंगळे मु. अ.जि.प.उ.प्रा. कुनाडा तसेच भद्रावती बिटांतर्गत सर्व मुख्याध्यापक, विषय शिक्षक , सहा. शिक्षक तथा सर्व शाळा वेवस्थापन समिती सदस्य, सर्व तंटामुक्ती समिती सदस्य, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व ग्रामवाशी मंडळी कुनाडा हे मोलाचे सहकार्य देणार असल्याचे राजेंद्र पाटील केंद्र प्रमुख - भद्रावती यांनी  बोलताना सांघितले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli