Today : 14:08:2020


अवैध उत्खनन करून ठेकेदार करीत आहे रस्ता तयार .. (शासनाच्या तिजोरीला चुना, तलाठ्याची भुमिका संशयास्पद)

गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-   गडचांदुर शहरा जवळील अंमलनाला प्रकल्पाच्या खालील भागात असलेल्या बैलमपुर ते मानोली या गावाच्या डांबरी रस्त्या नंतर अंमलनाला प्रकल्प वेस्ट वेअरच्या बाजुने पुगडीमेटा या गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण करण्यात येत आहे. मात्र या कामासाठी लागणारी रवाळी व बोल्डर शासनाने निर्धारीत केलेल्या खदानी वरून न आणता थेट जवळच्या ठिकाणी अवैध उत्खनन करून आणली जात असल्याचे चित्र दिसत असून यात क्षेत्राचे संबंधित तलाठ्याची भुमिका संशयास्पद बनली आहे.
     राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला ईसापुर तलाठी साजा अंतर्गत येणाया बैलमपुर - पुगडीमेटा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काही दिवसा पासून सुरू आहे. या कामा करीता लागणारी रवाळी व बोल्डर संबंधित कंत्राटदार शासन मान्य खदानी (लिज) वरून न आणता लगतच्या हिरापुर येथील नविन शाळा, वसतीगृह मागील नाल्यात अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरच्या मदतीने आणली जात आहे. विशेष म्हणजे या खोदकामात एक लहान मुलगी सुद्धा दिसत असून ही बाल मजुर असल्याची शंका निर्माण झाली आहे. शासनाने दिलेल्या लिजचा अंतर अंदाजे १२ कि.मी. असून ५ कि.मि. हिरापुर गावातुन  आणले जात आहे. यामुळे एकिकडे शासनाचा महसुल बुडत आहे तर दुसरीकडे ठेकेदाराची चांदी होत आहे. टी.पी.चे ठिकान वेगळे, मटेरियल दुसऱ्या ठिकानातुन, असे चित्र सध्या दिसत आहे. हि बाब तलाठयाच्या निदर्शनास आली नसेल का ? या विषयी चर्चेला उधान आले असून यात तलाठ्याची भुमिका संशयास्पद बनली आहे. तहरीलदारानी त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची गरज असून या प्रकरणी संबंधितावर कोणती कारवाई होते हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे.

            " येरगव्हाण (उम्मरझरा) या ठिकानी शासनाने लिज दिली असून हिरापुर या गावच्या ठिकाणी कोणतीच लिज दिलेली नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर असून या संबंधी चौकशी करणार " रविन्द्र होळी, तहसीलदार राजुरा
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षि