Today : 09:08:2020


प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ व खडसंगी मध्ये गरोदर माता तपासणी शिबीरात अनियमितता त्या पुरवठा कंत्राटतदारास काळ्या यादीत टाका : विलास डांगे

चिमूर, फिरोज पठाण  :-  मानव विकास अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र याठिकाणी गरोदर माता, लहान मुलांची आई व बालके यांचे रोग निदान तपासणी शिबिर प्रयेक आरोग्य केंद्रात महिन्याला दोन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या शिबिरात रोगनीदान तपासणी नोंदणी केलेल्या लाभार्थी करिता ४७ रुपये दराने जेवण देण्याचे करारनामा झालेला आहे. तसेच शिबिरार्थीना गैरसोय होऊ नये म्हणून बसण्याकरिता खुर्ची, ६० बाय ६० चा पेडल व १० बाय ६० च्या सायडिंग तसेच २ ग्रिनम्याट लावण्याचा करार नामा झालेला असून आज दि २३ डिसेंबरला झालेल्या गरोदर माता तपासणी शिबिर मासळ व खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात करार नामा नुसार संबंधित कंत्राटदारांने अनियमितता केल्याने त्या पुरवठा धारक कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून अनामत रक्कम वापस करण्यात येऊ नये अशी मागणी माजी जि. प. सदस्य विलास डांगे यांनी केली आहे.
     चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, राजुरा, गोडपिपरी, पोंभुर्ण, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व वरोरा या तालुक्यातील मानव विकास योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर माता, स्तनदा माता व बालके यांची रोग निदान शिबिर मार्फत तपासणी महिन्याला दोन शिबिर प्रत्येक आरोग्य केंद्राला घेतले जातात शिबिरातील लाभार्थी करिता कंत्राटदाराने ४७ रुपये प्रति थाली पोटभर जेवण व जेवणासोबत वरन भात भाजी पोळी व एक गोड पदार्थ असे या प्रमाणे देण्यात यावे असा आदेश मुख्यधिकारी चंद्रपूर यानी काढले तसेच गरोदर महिला, स्तनदा माता व बालके याची गैरसोय होऊ नये म्हणून पेडल चार पल्याचे तसेच, १० बाय ६० च्या दोन सायडिंग १५बाय ३० च्या दोन ग्रिनम्याट व खुर्ची असा करारनामा कंत्राटदाराने करून देऊन हि करार नाम्याचा भंग केला आहे. 
     प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी यांनी आयोजीत केलेल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चिमूर उपकेंद्रात झालेल्या कार्यक्रमात मंडप करार नामा प्रमाने कोणताही पुरवठा केलेला नाही. तसेच जेवणामध्ये गोड पदार्थ शिबिर्थीला देण्यात आलेला नाही. आज दि २३ डिसेंबर च्या तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ व खडसंगी येथे करार नामा प्रमाणे पेडल करारनाम्यानुसार केला नाही शिबिरार्थी सोबत संवाद साधला असता दुपारी दिड वाजता पर्यत दोन्ही शिबिरात जेवण पुरवठा झालेला नाही या संदर्भात माजी जि.प. सदस्य विलास डांगे यांनी मासळ केंद्राच्या आरोग्य अधिकारी अने मॅडम व खडसंगीचे आरोग्य अधिकारी नन्नावरे यांचेशी चर्चा केली असता दोन्ही अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास करारनाम्याचा भंग केल्याने देयके दिले जाणार नाही व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले तसेच तालुका वैधकीय अधिकारी मेश्राम यांना फोन वरून माहिती दिली त्यावेळी त्यांनी अणे मॅडम यांना वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे सांगितले.
      जिल्ह्यातील शिबिराचे ठिकाणी कंत्राटदार हे जेवण व पेडल पुरवठा करार नाम्याप्रमाणे करीत नसून गरोदर माता व बालके यांचे शारीरिक, मानसिक त्रास देण्याचे काम चालविले आहे या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी गोगुलवार यांनी तातडीने दखल घेऊन दोन्ही कंत्रातदाराचे कंत्राट रद्द करून होणारा गैरप्रकार थांबवावा व त्या कंत्राट दारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी माजी जी.प. सदस्य विलास डांगे यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliअहेरीत पत्रकार दिन साजरा (उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप)

2018-01-08 | News | Gadchiroli