Today : 04:06:2020


उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले तिघांना चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

चिमूर, फिरोज पठाण :-   गुन्हेगारी वृत्तीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून गुन्हेगारांविरुद्ध उघडपणे कोणीही व्यक्ती पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरतात तसेच गुन्हेगारांच्या कृत्यावर वेळीच प्रतिबंध घालण्याकरिता चिमुरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी नरेश गौतम मेश्राम (वय ३४, खळसंगी) विजय केवलराम शेंदरे (वय २२, सावरगाव) व राकेश परशुराम ठाकरे (वय २८, सिंदेवाही) आदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १९५१ चे कलम ५७ अन्वये चंद्रपूर जिल्ह्याचे हद्दीतून ४ महिन्याच्या कालावधीकरिता हद्द पार केले आहे. 
     सविस्तर वृत्त असे आहे कि, पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे पत्रानुसार कलम ५६ (अ), ब मधील तरतुदीनुसार हद्द पार करण्यात आलेले व्यक्ती यांना पंजीबद्द करण्यात आले. हद्द पार करण्यात आलेले व्यक्ती गावात दारू विक्रीचा व्यवसाय करतात पोलिसांनी कित्तेकदा त्यांची पकडून त्यांना जेलमध्ये टाकले तरी देखील त्यांचे वर्तनातं कोणत्याही प्रकारच्या बदल झाले नाही उलट दिवसेंदिवस ते मोठया प्रमाणात दारू वाहतूक करून दारू विक्री सुरु ठेवली होती. त्यामुळे वार्डातील तसेच गावातील लोक दारू पिऊन नेहमी झगडा भांडण करीत असतात या कृतीमुळे महिला व लोकांमध्ये भीती निर्माण झाली अनेक गरीब कुटुंब उध्वस्त झाले आहेत. 
     त्यामुळे अवैध्य विक्रीला आळा घालण्यासाठी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी सार्वजनिक मालमत्ता सामान्य जनतेची मालमत्ता जीविताला हानी पोहचू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी हरीशधार्मिक यांनी दिनांक २० डिसेंबर २०१७ रोजी हा आदेश पारित करून या तिनही व्यक्तीनां  चंद्रपूर जिल्ह्यातून ४ महिन्यासाठी हद्दपार केले आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-23


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur