Today : 15:08:2020


जवाहरनगर येथे रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन (२५ ग्रंथाचे प्रकाशन)

बोली जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली चळवळीचे - बंडोपंत बोढेकर
चिमूर,  फिरोज पठाण  :-  बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचे ढिगारा बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल तेव्हा भाषा अधिक समृद्ध होईल. एखाद्या म्हातारीने आपली जरतारी पण फाटकी वस्त्रे जपून ठेवावीत, त्याप्रमाणे झाडीबोली चळवळीने या बोलीचे महत्व उपयोगिता पटवून दिली आहे. 
     तसेच बोली जीवंत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली चळवळीने केलेले आहे, असे प्रतिपादन पंचवीसव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य  बंडोपंत बोढेकर यांनी केले. ते तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्र द्वारा आयोजीत  झाडीबोली साहित्य मंडळाच्या  रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनात जवाहरनगर येथे बोलत होते. सदर संमेलन आर्ट कामर्स महाविद्यालयात सुरू झालेले आहे. उद्घाटन अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाँ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे हस्ते झाले.
     या प्रसंगी भवई लोकनाट्याचे विशेषज्ञ मोतीभाई नायक गुजरात, राष्ट्रीय बालगोष्टी चे आयोजक उदय किरोला अलमोडा उत्तराखंड, डाँ .अनिल नितनवरे भंडारा, डाँ .तिर्थराज कापगते नागपूर, डाँ .हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष डाँ .मनिष टेंभरे, नरेश देशमुख, डाँ.गुरूप्रसाद पाकमोडे, प्राचार्य अजय मोहबंसी, सर्व पुर्वाध्यक्ष आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविकातून डाँ. गुरूप्रसाद पाकमोडे यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास कथन केला तर डाँ.हरिश्चंद्र बोरकर यांनी ह्या चळवळीचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट केले केले. 
     तसेच पूर्व स्वागताध्यक्ष मधुसुदन दोनोडे  यांनी आपला अनुभव सांगीतल्यानंतर विद्यमान स्वागताध्यक्ष  डाँ.मनिष टेंभरे स्वागतपर भाषण केले. याप्रसंगी उत्तराखंड चे उदय किरोला आणि गुजरात चे मोतीभाई नायक यांनी आपल्या प्रांतातील आठवणी सांगून झाडीबोली चळवळीची प्रशंसा केली. डाँ.अनिल नितनवरे व डाँ. तिर्थराज कापगते यांनी मार्गदर्शन केले. लोकराम शेंडे यांनी झाडीगौरव गीतांचे गायन केले. उद्घाटनपर भाषणात श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, भाषा ही शुध्द किंवा अशुद्ध नसते तर तीला भाषाशास्त्राचे नियम लावून अधिक तीला आपण क्लिष्ट करीत असतो. झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ आहे. बोली ही मुळात पवित्र  असून तीची सेवा करणाऱ्या झाडीबोली चळवळीने एक दबावगट निर्माण केला आहे. सूत्रसंचालन प्रा. नरेश आंबीलकर यांनी केले तर आभार प्राचार्य डाँ.अजय मोहबंसी यांनी केले. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकूण २५ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मुल, प्रतिनिधी :-
मुल तालुक्यातील नांदगाव येथील ग्